*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने संपन्न.*
करकंब/ प्रतिनिधी
*करकंब येथील DAV रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने संपन्न. महिला दिनानिमित्त आज प्रशालेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील शिक्षिका उत्पात मॅडम, अश्विनी शिंगटे मॅडम,शेख मॅडम,काळे मॅडम यांनी केले.*
*यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रशालेतील सर्व महिला शिक्षिकांचे सन्मान करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.यावेळी सौ.उत्पात मॅडम,सौ.शेख मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.अतुल अभंगराव यांनी सुत्रसंचलन केले.आजचा जागतिक महिला दिन आनंदाने, वक्तृत्व स्पर्धेने साजरा करण्यात आला*