*जिजाऊ ते सावित्री सन्मानांतर्गत करकंब येथे आरोग्य मार्गदर्शन* *रामभाऊ जोशी हायस्कूल येथे महालसिकरण मोहीम संपन्न*

*जिजाऊ ते सावित्री सन्मानांतर्गत करकंब येथे आरोग्य मार्गदर्शन*  *रामभाऊ जोशी हायस्कूल येथे महालसिकरण मोहीम संपन्न*

करकंब/ प्रतिनिधी 

दयानंद शैक्षणिक संकुल करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल व महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यू काॅलेज येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या अभिमानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये प्रशालेतील इयत्ता 5वी ते 9 वी विद्यार्थ्यांना मेंदुज्वर लस,15ते 18वयोगटातील 10वीते12विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीते अंतर्गत कोवॅव्क्सिन लस देण्यात आले.

 
    यावेळी आरोग्य तपासणी मोहिमेचे प्रमुख आरोग्य सेवक सुनिल लादे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहीती देताना शारीरिक व्यायाम व आरोग्य आहार,कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे मार्गदर्शन,लसीकरणाचे महत्व सांगतीले.शालेय व्यवस्थापन समीतोचे मार्गदर्शक,माझी जि.प.अध्यक्ष बाबुराव(अण्णा) जाधव यांनी विद्यार्थ्यांना सर्व नियमांचे पालन कसे करावे, व्यायामाचे महत्त्व या विषयी माहीती सांगीतले.
      या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण (तात्या) वंजारी, प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,आरोग्य सुपरवायझर खरात एस एस,आरोग्य सेविका एम.जी.माळी,आरोग्य सेविका,आशा सेविका  कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अमर चव्हाण,मनोज पवार,संजय मोहीते,रणे,परमेश्वर धोत्रे,पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.