*सांगोला तालुक्यातील बळीराजाच्या हक्काच्या पाण्यासाठी  ढाण्या वाघाचा पुढाकार*  *पाणीप्रश्न सोडविण्यासाठी  माजी आ.शहाजीबापू पाटील प्रशासकीय यंत्रणेला सूचना*

*सांगोला तालुक्यातील बळीराजाच्या हक्काच्या पाण्यासाठी  ढाण्या वाघाचा पुढाकार*   *पाणीप्रश्न सोडविण्यासाठी  माजी आ.शहाजीबापू पाटील प्रशासकीय यंत्रणेला सूचना*

पंढरपूर /प्रतिनिधी

सांगोला परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मा.आ.शहाजीबापू पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून पाणी उपलब्धतेबाबत ठोस पाठपुरावा केला. पारे तलावात येत्या चार ते पाच दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले असून, रविवारपर्यंत माण नदीचे आवर्तन पूर्ण करून सोमवारी कॅनॉलमध्ये पाणी आणण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचावा, यासाठी पाणी वाहून नेताना होणारी गळती तातडीने थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. NRBC चे क्षीरसागर साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचे लिकेज आहेत, ते तातडीने बंद करून पाणी पुढे सुरळीतपणे सोडण्याबाबत मा.आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट निर्देश दिले.

### मान नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार

परिसरातील पाण्याची गरज लक्षात घेऊन मान नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

### टेंभू योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने

टेंभू योजनेच्या माध्यमातून कॅनाल तसेच बंदिस्त पाईपलाईनद्वारे संबंधित सर्व गावांचे आवर्तन पूर्ण क्षमतेने करण्याबाबत चर्चा झाली. पाणी वितरणातील अडथळे दूर करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

### म्हैसाळ योजनेतूनही पाणी उपलब्ध होणार

म्हैसाळ योजनेतून परिसरातील सर्व बंधारे तसेच संबंधित पाणी योजना पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

**“परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न अविरत सुरू राहतील. परिसर सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जाईल,”** असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

### अधिकारी व पदाधिकारी उपस्थित

या बैठकीस म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता कदम साहेब, कार्यकारी अभियंता मासाळ साहेब, टेंभू योजनेचे हारगुडे साहेब व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तसेच मा. अशोकभाऊ शिंदे, मा. विजयदादा येलपले, चेअरमन अनिल खटकाळे, मा. अनिल मोटे, मा. योगेश खटकाळे, सुखदेव येड्रॉवकर, महादेव लाडे, अजय ताटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वेळेत आणि पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.