*करकंब पोलिस ठाण्याच्या सहा. पोलिस निरीक्षक पदी निलेश तारू यांची नियुक्ती.* *सपोनि महेश मुंढे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ*
: करकंब/ प्रतिनिधी
करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील पदोन्नती पर कोल्हापूर येथे बदली झाल्यानंतर करकंब पोलिस ठाण्याच्या सहा.पोलिस निरीक्षक पदी पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे वाचक शाखेतील स.पो. नि.निलेश शिवाजी तारु यांची करकंब पोलिस ठाणे येथे नेमणूक करण्यात आली आहे.तर करकंब पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक महेश मुंढे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत 26 गावे येत आहेत. या पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी त्यांना या पोलिस स्टेशन अंतर्गत सहा महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. गेल्या काही दिवसापासून करकंब पोलीस ठाण्यास कोणत्या प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक होणार याची उत्सुकता लागलेली होती. अखेर पोलीस प्रमुखांनी वाचक शाखेतील निलेश तारू यांची प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.