*करकंब ग्रामपंचायत नगरपंचायत होण्याच्या मार्गावर.....?*

 *करकंब ग्रामपंचायत नगरपंचायत होण्याच्या मार्गावर.....?*

: करकंब /प्रतिनिधी:

करकंब हे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच बाबतीत आघाडीवर असलेले व सतत चर्चेत असलेले पंढरपूर व माढा तालुक्याची राजकिय राजधानी असलेले सर्वात मोठ्या लोकसंख्येचे व 17 सदस्य असलेले गाव.. करकंब गाव नगरपंचायत कधी होणार... कधी होणार या आशे पोटी अनेक जण-नगरपंचायत झाल्यास भावी नगरसेवक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून ही नगरपंचायती कधी होईल.... या मोठ्या अपेक्षेने व आतुरतेने गल्लीपासून अगदी मंत्रालयापर्यंत दिव्य स्वप्न पहात असल्याने हे दिव्य स्वप्ने कधी कुणाला पहाटेच्या सुमारास तर कधी दिवसा पडत असल्याने अनेक जण मोठमोठ्या ज्योतिषांकडे आपली कुंडली पाहण्यासाठी गेल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे .दिवस-रात्र एक करून पाठपुरावा करण्याचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. असे असले तरी मुळात नगर पंचायत करण्यासाठी करकंब ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा मूळ ठराव नसल्याकारणाने आज पर्यंत करकंब ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले नाही

.

परंतु एका खात्रीलायक वृत्ताने लवकरच करकंब ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत होणार असून त्यास हिरवा कंदील मिळाला असल्याची खात्रीलायक वृत्त आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षनेते यांच्यातील होत असलेला संघर्ष सध्या संघर्षाच्या ऐवजी संयम याकडे वाटचाल सुरू असलेली दिसून येत असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे करकंब ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होण्याच्या मार्गावर आहे की काय अशी चर्चा करकंब मधील नागरिकांमधून केली जात आहे. शेवटी काय ग्रामपंचायत..... पुन्हा पंचायत.... अन पुन्हा नगरपंचायत......! सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चा तर होणारच.