राष्ट्रीय नाभिक संघटनेचे पंढरीतील नूतन पदाधिकारी यांचा आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार!* *शहराध्यक्षपदी गणेश माने, युवक अध्यक्षपदी तुकाराम चव्हाण, तर कार्याध्यक्षपदी अनिल शेटे यांचे केले स्वागत*

पंढरपूर :प्रतिनिधी

राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या पंढरपूर येथील पदाधिकारी यांच्या नुकत्याच निवडी पार पडल्या आहेत, त्यांचा आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

.
     हा सत्कार आ. आवताडे यांच्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालय येथे करण्यात आला, यामध्ये पंढरपूर शहराध्यक्षपदी गणेश किसन माने, युवक अध्यक्षपदी तुकाराम धोंडिबा चव्हाण, कार्यध्यक्षपदी अनिल शेटे यांच्या निवडीबद्दल करण्यात आला.
 यावेळी आ. समाधान आवताडे यांच्या पंढरपूर संपर्क कार्यालयाचे प्रमुख अविनाश मोरे, बालम मुलांनी, आवताडे समर्थक प्रसाद उर्फ भैय्या  कळसे (मेंबर), रोहित उर्फ लाला पानकर, यांच्यासह राष्ट्रीय  नाभिक संघटनेचे महेश माने, सोमनाथ खंडागळे, अनुग्रह चव्हाण, नितीन पवार, दत्ता देवकर, सुजीत काळे, विजू माने, आदींसह  पदाधिकारी अन कार्यकर्ते उपस्थित होते.