*भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा लवकरच होणार सुरळीत* *खासदार अन आमदार यांचेसह महायुतीच्या शिष्टमंडळाची ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी* *सागर बंगल्यावर बंगल्यावरून जिल्हाधिकारी यांना तात्काळ दिले आदेश*

पंढरपूर/प्रतिनीधी 

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार जयकुमार गोरे,माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे, मा ‌श्री‌‌.रणजितसिंह शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांना मुंबई येथील सागर या शासकीय निवासस्थानी भेटून पंढरपुर तालुक्यातील भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबतची मागणी केली.
पंढरपूर तालुक्यातील नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक भुमिका दर्शविली आहे व या सर्वांच्या विनंती ला मान देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना ताबडतोप फोन करून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी 6 तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.