*राज्यभर कौतुक होत असलेल्या करकंब गावच्या लेकीचे झाड दुसऱ्या टप्प्यातील दीडशे वृक्षारोपण पुर्ती सोहळा* *करकंब गावचा निर्माण केला राज्यात वेगळा पॅटर्न* *सोलापूरची लेक प्रिसीजन उद्योग समूहाच्या व फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.सुहासिनी शहा यांची उपस्थिती लाभणार* *दिनांक ८जून ते २२जून वृक्षारोपण पंधरवड्यात १५०भारतीय वृक्ष लागवड करण्यात येणार
करकंब. / प्रतिनिधी.
:-सध्याच्या काळात पर्यावरणाच रक्षण करणे ही काळाची गरज ओळखून करकंब मध्ये करकंब गावच्या लेकींच्या योगदानातून करकंब गावच्या लेकीचं झाड व जागर स्वच्छता अभियान टीमच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम करकंब मध्ये यशस्वीपणे सुरु झाला.पहिल्या टप्प्यातील१५० झाडे जोपासन्याच काम करत झाडांची वाढ सुंदर होत असतानाच दुसऱ्या टप्प्यातील पावसाळ्यातील १५० झाडांच वृक्षारोपण दिनांक ९जून ते २२ जून या पंधरवड्यात होत असून दिनांक २२जून रोजी सकाळी १५० वृक्षारोपण पूर्ती सोहळा सकाळी १०:००वा.श्री. ब्रह्मानंद महाराज मठाच्या पटांगणात होणार असून या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याची लेक प्रिसीजन उद्योग समूहाच्या व फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.सुहासिनी शहा,विक्रम कदम साहेब (डी.वाय.एस.पी.)वक्ते सुरेश पवार (मरवडे)राजू आटोळे,(रेंज फॉरेस्ट ऑफिसर)तसेच जि.प.सदस्या रजनीताई देशमुख, बाळासाहेब देशमुख,सरपंच तेजमालाताई पांढरे,राहुलकाका पुरवत(पं.स.सदस्य),उपसरपंच आदिनाथ देशमुख,शिवाजी शिंदे (कृषी अधिकारी)श्री. सुभाष बरंगुळे (वनक्षेत्रपाल) भाऊसाहेब कळसाईत (वनक्षेत्रपाल) रघूनाथ जाधवसाहेब,अमोलदादा.शेळके,(मोहनजी अनपट चिंचणी)सर्व ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी व अधिकारी ,करकंब पत्रकार संघ,सर्व सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत होणार आहे,या उपक्रमात भारतीय झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असून यामध्ये करकंब मधील सर्व लेकींची भावनात्मक जोड या उपक्रमास लाभली असून त्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे,झाड लावणे ही काळाची गरज असून पुढील काळात एक व्यक्ती एक झाड उपक्रम राबवण्याचा आमचा मानस असून या उपक्रमास प्रत्येक करकंबकरांनी पुढाकार घ्यावा असे अवाहन करण्यात येत आहे, तसेच या उपक्रमास सुहासिनी शहा यांच अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे तरी सर्व करकंबकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे व करकंब गावच्या लेकीचं झाड टीमच्या वतीनं करण्यात येत आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग काटवटे,हरिश्चंद्र वास्ते, नंदलाल कपडेकर, प्रमोद रेडे,गणेश पिसे,अक्षय नगरकर,आत्माराम चवरे,विजय जाधव,टीम व चेतन पुरवत,धोंडीराम भाजिभाकरे, अक्रूर शिंदे,जागर स्वच्छता अभियान टीम,सर्व महिला करकंब ग्रामस्थ आदी परिश्रम घेत आहेत.
या उपक्रमासाठी सतत परिश्रम घेणारे यांचे आणि विशेषता करकंब ग्रामस्थांचे राज्यभरातून कौतुक केले जात असून एक राज्यांमध्ये वेगळा आदर्श निर्माण करून यानिमित्ताने करकम गावचा एक वेगळा पॅटर्न निर्माण केला असल्याचे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.