*परळी वैजनाथ येथील विद्या वर्धनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताह संपन्न....!* *प्रशालेत विविध स्पर्धांचे आयोजन* *ऊर्जा बचतीचे महत्व व कल्पनाशक्ती विकास यावर केले प्रबोधन* *ऊर्जा संवर्धनासाठी पाच हजार रुपयाचे प्रशालेस पारितोषिक.*
करकंब/ प्रतिनिधी:
-नवीन शक्ती कुंज वसाहत परळी वैजनाथ येथील विद्या वर्धनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये
परळी औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती परळी वैजनाथ ,महाराष्ट्र शासन व महाऊर्जा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महा ऊर्जा विभागीय कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 डिसेंबर 2021ते 20 डिसेंबर 2021 हा सप्ताहा म्हणून सर्वत्र साजरा केला जातो .त्या अनुषंगाने विद्या वर्धनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी चित्रकला स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धन विषयी अधिक जागरूकता निर्माण व्हावी. तसेच विजेची कार्यक्षम उपकरणे आणि ऊर्जेचा कार्यक्षम वापर याविषयीची आकलन व शैक्षणिक क्षमता वाढावी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होऊन त्यांची संशोधन वृत्ती जोपासली जावी आणि ऊर्जा बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शाळेत ऊर्जा क्लबच्या माध्यमातून ऊर्जा बचत या विषयावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करून ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला ऊर्जा संवर्धन सप्ताह आयोजित करण्यात आला .निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे शाळेत आयोजन करण्यात आले. खालील प्रमाणे गटनिहाय विविध स्पर्धा गट:-इयत्ता पाचवी ते सातवी च्या स्पर्धा :-निबंध स्पर्धा:- (1)अथर्व राहुल कुरकुट 6वी ब- 250 रूपये (2 )वेदांत नारायण फड 6वी अ -200 रूपये (3)अनुष्का बिभीषण मुंडे 6वी ब-150 रूपये - (4 )सृष्टी संतोष तिडके6वी अ- 100 रूपये घोषवाक्य स्पर्धा :- (1) सृष्टी संतोष तिडके 6वी अ -200 रूपये (2)संस्कार दामोदर मुंडे 5वी ब- 150 रूपये (3) प्रणव प्रवीण नव्हाडे 5वी ब- 100 रूपये (4)वेदांत नारायण फड 6वी अ -50 रूपये चित्रकला स्पर्धा:- (1) वेदांत नारायण फड 6वी अ -250 रूपये (2)समृद्धी नारायण कांबळे 5वी ब -200 रूपये (3)आदित्य रामदास फड 7वी अ --150 रूपये( 4 )संस्कार दामोदर मुंडे 5वी ब-100रूपये गट:-इयत्ता आठवी ते दहावी च्या स्पर्धा:- निबंध स्पर्धा:-( 1 )परी भागवत दहिफळे8वी ब -250 रूपये (2)विजया कबीरदास वाव्हळे10 वी अ -200 रूपये( 3 )सानिका नरहरी टेकाळे 9वी अ -150 रूपये (4 )अंकिता रामेश्वर बारटक्के 8वी ब- 100 रूपये घोषवाक्य स्पर्धा :-(1 )प्राची विठ्ठल कोकाटे 9वी ब -200 रूपये (2)तनुजा भगवान भांड 9वी क -150रूपये (3 )ऋतुजा नरहरी फड 8वी अ -100रूपये (4 )गायत्री श्रीमंत ढाकणे 10वी अ- 50 रूपये चित्रकला स्पर्धा :-(1) ऐश्वर्या पृथ्वीराज कदम 10वी ब -250 रूपये( 2 )वैष्णवी रामकिशन गर्जे 10वी क -200 रूपये( 3)साक्षी रामदास फड 10वी क-150 रूपये (4)श्रेया संजय गिरी 9वी ब -100 रूपये इत्यादी सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्रथम ,द्वितीय, तृतीय ,उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला व सर्व विद्यार्थ्यांना रोख रक्कम पारितोषिक महाराष्ट्र शासन व महाऊर्जा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालय लातूर यांच्यातर्फे देण्यात आली. तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती परळी वैजनाथ यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्र मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम मातेकर यु एच , मुख्याध्यापक विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालय नांदुरकर आर आर मुख्याध्यापक विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय पालक वाव्हळे साहेब तिडके साहेब यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आजच्या या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन व स्पर्धेचे मार्गदर्शक सूर्यवंशी पी.व्ही. यांनी परिश्रम घेतले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले आभार प्रदर्शन श्री सूर्यवंशी पी व्ही यांनी केले.