*उत्तर सोलापूरच्या शिवसेनेत एकमत* *कळमण येथील जनसंवाद मेळाव्यात राजाभाऊ खरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब*

*उत्तर सोलापूरच्या शिवसेनेत एकमत*  *कळमण येथील जनसंवाद मेळाव्यात राजाभाऊ खरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब*

पंढरपूर/प्रतिनीधी

मोहोळ विधानसभा मतदार संघात उत्तर सोलापूर तालुक्यातील २४गावचा समावेश आहे . या भागातील शिवसेना आणि युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा कळमण येथील खंडोबाच्या साक्षीने पार पडला यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. या मेळाव्यात उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने उद्योजक राजाभाऊ खरे यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले . यासाठी उपस्थित शिवसेना आणि युवा सेनेत एकमत झाल्याचेच दिसून आले आहे .
   उत्तर सोलापुर हा शिवसेनेसाठी मोठा बालेकिल्ला समजला जात आहे. या तालुक्याने मागील वेळेस उत्तम प्रकाश खंदारे यांना आमदार केल्याचे पहिले आहे. त्यानंतर मतदार संघ फेररचनेत या तालुक्यातील २४गावे मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाला जोडलेली आहेत. या गावामधून मागील तीन वेळा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मताचा मोठा कौल दिला आहे. 
    आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र याच २४गावातील तमाम शिवसैनिक यांनी काहीही झाले तरी ही निवडणूक शिवसेनेच्या उमेदवाराने लढविली पाहिजे. शिवसेनेनेही हीच उमेदवारी आम्हा शिवसैनिकांना बळ देणारे उद्योजक राजाभाऊ खरे यांनाच दिली जावी. अन्यथा आम्हाला गृहीत धरू नये. असा इशाराच शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख राजकुमार शिंदे यांनी महायुतीला दिला आहे.आजवर संख्येने मोठ्या असलेल्या शिवसैनिकांना आधार आणि बळ देणारे सक्षम नेतृत्व आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना विस्कटकेल्या अवस्थेत पहावयास मिळत होती. मागील काही महिन्यापासून आम्हा शिवसैनिकांना उद्योजक राजाभाऊ खरे हे मोठा आधार वाटू लागले आहेत. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील तमाम शिवसैनिक खरे यांच्यासाठी रात्रीचा दिवस करून . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला शिवसेनेचाच आमदार देणार असल्याचेही उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी आपल्या संवाद मेळाव्यात जाहीर केले आहे.
   यावेळी मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांनीही आपल्या भाषणात आपण चळवळ मधील एक सच्चा शिवसैनिक आहोत.आजवर एक पक्ष, एक झेंडा एवढेच शिवसेनेत निष्ठावंत म्हणून वावरलो आहे. याच तळमळीचे शिवसैनिकांचे बळावर आपण आगामी विधानसभा लढविणार आहोत. आपण सेवेची संधी दिल्यास आपण मागील अनेक वर्ष या भागाचा विकासकामात राहिलेला बॅकलॉग भरून काढू. असे आश्वासन दिले. आपल्या भागातील अनेक कामे तर आपण निवडणूक लढविण्यापूर्वीच मार्गी लावणार आहोत. बरीचशी कामे स्वानिधी देऊन केलेली आहेत. यापुढेही करत राहणार आहे. आपण आमदार नसताना एवढे करून दाखवीत असेल तर आपण संधी दिल्यास माझ्या कामाचा आवाका वाढून आपल्या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. असेही खरे यांनी सांगत, येणाऱ्या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही केले आहे.
    या जनसंवाद मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपला संवाद साधला. यामध्ये लक्ष्मण मुटकुळे, शिवाजी ननवरे, संजय पवार,संजयकुमार लंबे, आदिनाथ गाडेसर, यांचेसह अनेकांचा समावेश आहे.
        यावेळी शिवसेना जिल्हा उप प्रमुख बजरंग देवकर, उत्तर सोलापूर उप तालुका प्रमुख उमाकांत करंडे, युवा सेनेचे तालुका प्रमुख आकाश गाजघाटे,मोहोळ विधानसभा मतदार संघ प्रमुख प्रकाशदादा पारवे, माजी सरपंच प्रकाश सपाटे, सरपंच संभाजी लेंगरे, संजय मस्के, समाधान बाबर, सरपंच लक्ष्मण राठोड, लखन जगताप, सागर मांजरे, सत्यवान सावंत, ज्ञानोबा जगताप,सोन्याबापू माळी, अंकुश लंबे, काका लंबे, दिलीप माळी, महादेव धोत्रे, सरपंच पांडुरंग परकाळे, सरपंच अरुण बनसोडे,यांचेसह उत्तर सोलापूर भागातील विविध गावचे सरपंच व सदस्य, सोसायटी चेअरमन,सदस्य, शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी, गवोगावचे शाखा प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संखयेने उपस्थित होते.