*आता..पंढरपूरकर घाण पाणी पाजणाऱ्याना जागा दाखवतील* *डॉ प्रणिता भालके यांना मतदाराबद्दल ठाम आत्मविश्वास*
पंढरपूर /प्रतिनिधी
मागील अनेक वर्ष सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यानी कायमच दूषित मैलामिश्रित पाणी तीर्थ म्हणून पाजण्याचे पाप केले आहे . त्यासाठी आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ पंढरपूर येथील नागरिकांना मिळाली आहे.त्याचा वचपा नक्कीच काढतील असा ठाम विश्वास तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. प्रणिता भालके यांनी व्यक्त केला आहे.
नगरपालिका निवडणुक दरम्यान गोविंदपुरा येथील कॉर्नर सभेत डॉ प्रणिता भालके बोलत होत्या.यावेळी
पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 4,,अ मधील उमेदवार धनंजय दशरथ कोथळकर व ब मधील उमेदवार पूनम साईनाथ अभंगराव तसेच प्रभाग क्रमांक5,ब मधील सुमित संभाजी शिंदे, प्रभाग क्र.9 सविता अशोक करकमकर यांच्या प्रचारार्थ सभेत व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉ. प्रणिता भालके म्हणाले की, आता आपल्याला पंढरीचा विकासच करून दाखवायचा आहे.त्याची सुरुवातच नगरपालिकेच्या इमारतीपासून कामाची सुरुवात करावी लागणार आहे .मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाहीत. किती योजना मिळाल्या. किती लोकांच्या हाताला काम मिळाले?. यासाठीच आता आपल्या हक्काचे लोक नगरपालिकेत असावेत. अशी मानसिकता पंढरपूर येथील नागरिकांची
तयार झाली आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ असल्याचाही आपल्याला आत्मविश्वास असल्याचे डॉ. प्रणिता भालके यांनी व्यक्त केले आहे
तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.तो वचननामा असेल.यामधील जे विषय सादर केले आहेत. त्यामध्ये मूलभूत सुविधा पासून सुरवात करावी लागणार आहे.
चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळीला गेल्यावर महिलाना चेंजिंग रूम नाहीत.भाविकांसाठी ही गोष्ट किती दुर्दैवी आहे
पंढरपूर शहरातील कुठल्याही परिसरात फिरत असताना धुळीच मोठ साम्राज्य आहे . पंधरा दिवस पंढरपूरमध्ये फिरत असताना अक्षरश्या आमच्या घशातून आवाज बाहेर येईना झाला आहे.एवढी धुळा माती आमच्या घशात जाऊन बसलेली आहे. हे फार मोठ घातक आहे .आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फुफुसाचे आजार होत असल्याचेही डॉ प्रणिता भालके यांनी सांगितले आहे.
पाणीपुरवठा होत असताना यामधील शुद्धता किती आहे. अतिशय घाण दर्जाचे पाणी आपल्याला पुरवठा केला जातो . त्यासाठी काय करायची गरज आहे. पाण्याची जी फिल्टरेशन क्षमता आहे. ती कुठेतरी सुधारण्याची गरज आहे. पाण्याचा टीडीएस वेळोवेळी चेक करण्याची गरज आहे.
खड्डे मुक्त पंढरपूर करावे लागणार आहे. युवकांना त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल या गोष्टीचा पहिला विचार केला जाईल. उच्च शिक्षण घेवून बाहेर रोजगारासाठी जावे लागतेय हीच मोठी शोकांतिका असल्याचे डॉ प्रणिता भालके यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येथील रोजगारावर जीवन जगणारे लोकांना आपण कायम सहकार्य करणार असल्याचे सांगितल.
शहरातून छोटी छोटी मुलं आपल्या बघायला मिळतात. नगरपालिकेच्या शाळेची जी अवस्था आहे ती तुम्ही सगळ्यांनी बघितलेलीआहे .कुठल्याही आई-वडिलांना आपल्या मुलांना त्या नगरपालिकेच्या शाळेत पाठवायचं धाडस देखील होत नाही .कारण एखादी भिंत पडेल किंवा एखादा पत्रा अंगावर पडेल अशी भीती प्रत्येक माय माऊलीच्या मनामध्ये आजही आहे . त्यामुळं आपली सत्ता आल्यास सर्व शाळा सुसज्ज करण्यात येतील असेही सांगितले.
पंढरपूरमध्ये जी तीर्थक्षेत्र आहे .छोटी छोटी मंदिर आहेत .हेरिटेज प्रॉपर्टी आहेत. त्यांचे जतन कुठल्याही पद्धतीने केलं जात नाही. ते जतन करण्याची गरज आहे.
मी नगराध्यक्ष म्हणून नक्की जाणार आहे . त्यासाठी मला येणाऱ्या दोन तारखेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि तुमच्या पाठिंबाची गरज आहे. या अगोदर आदरणीय नानांना त्यांच्या पाठीमागे राहण्याची त्यांच्या पाठीवरती आशीर्वाद ठेवण्याची जी जबाबदारी पार पडलेली आहे .तीच आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याची त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद देण्याची गरज आहे . असेही भालके यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी माजी क्रीडा राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, साईनाथ अभंगराव भगीरथ भालके, गणेश अंकुशराव, माजी नगरसेविका मनीषा ,माऊली काळे, बापू शिंदे, राहुल पुणेकर, संदीप थोरात आदीसह मतदार, महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.