* पंढरीत सत्यवर्धन एनटरप्राईजेस चा उद्घाटन समारंभ संपन्न*

* पंढरीत सत्यवर्धन एनटरप्राईजेस चा उद्घाटन समारंभ संपन्न*

नारायण चिंचोली/प्रतिनिधी

:-पंढरपूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सत्य वर्धन एटरप्राईजेस या फार्मचा उद्घाटन समारंभ गुरुवारी 30 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा डी. व्ही.पी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप मांडवे ,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर भोसले , पी.आय माने साहेब,तेसला पॉवर कंपनीचे अमर शिंदे, टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणपत कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले की चव्हाण कुटुंबाने हा सत्यवर्धन एनटरप्राईजेस सुरू करून नामांकित टेस्ला पावर या कंपनीचे बॅटरी बँक शोरूम सुरू केले आहे त्यामुळे याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे तेसला ही कंपनी देशात एक नंबरची कंपनी असून या कंपनीचे फर्म पंढरपुरात प्रथम सुरू होत असून ती अभिमानाची गोष्ट आहे सत्य वर्धन एनटरप्रायजेस ने ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा असेही यावेळी सांगितले 
यावेळी अभिजीत पाटील म्हणाले की तेसला कंपनीही नामांकित कंपनी असून सध्या टू व्हीलर ,फोर व्हीलर आदी वाहन वापराचे प्रमाण वाढले असून या कंपनीच्या माध्यमातून पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होण्यास मदत होणार आहे
यावेळी प्रकाश पाटील युवराज पाटील गणेश पाटील अमर शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष अँड दिपक पवार, मोहम्मद वस्ताद,  संतोष बंडगर, स्वप्निल जगताप, कृष्णात माळी ,एम.पी मालक आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सत्यवर्धन इंटरप्राईजेस चे मालक संतोष चव्हाण यांनी केला सर्व उपस्थितांचा आभार बाळासाहेब चव्हाण ,नानासाहेब चव्हाण यांनी मानले