*मंगळवेढ्यातही मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या पदयात्रेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी* *जनतेच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे माझा विजय निश्चित* *दिलीप धोत्रे  यांना भक्कम खात्री*

*मंगळवेढ्यातही मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या पदयात्रेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी*  *जनतेच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे माझा विजय निश्चित*  *दिलीप धोत्रे  यांना भक्कम खात्री*

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात  निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ संत दामाजी चौक येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली होती.

 
यावेळी मंगळवेढ्यातील नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत त्यांना मोठा प्रतिसाद दिला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी अनेक प्रलंबित प्रश्न उपस्थित करत ते सोडवण्याचा नागरिकांना विश्वास देत जोरदार प्रचार यंत्रणा राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. 
त्यांनी मतदारसंघात कॉर्नर सभा, होम टू होम प्रचार, जाहीर सभा आणि पदयात्रेवर भर देऊन जोरदार प्रचार केला होता.
 यामुळे मतदारसंघातील नागरिकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दरम्यान मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना मतदार संघातील अनेक राजकीय नेते मंडळी,आजी-माजी नगरसेवक तसेच सर्वच समाजातील नेते मंडळींचा आणि ओबीसी समाज घटक म्हणून ओबीसी प्रवर्गातील सर्वच समाज घटकातील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. 
यामुळे मतदार संघात त्यांचे पारडी जड झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मनसे, भाजपा,काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशी चौरंगी लढत होत आहे.
निवडणूक रिंगणात असलेल्या चारही उमेदवारांच्या कामाची तुलना मतदारांकडून केली जात आहे.
 यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या नावाला नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.
याबाबत माध्यमांशी संवाद साधताना दिलीप धोत्रे यांनी सर्वसामान्य जनतेचे वाढते पाठबळ मिळत असल्याने माझ्या विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. 
 
मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.
त्यामुळे दिलीप बापू धोत्रे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात प्रलंबित असलेले प्रश्न, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर उद्योग निर्मिती करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याचा मानस दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे मतदार संघातील जनता मला निवडून देईल असा विश्वास मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला.