*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान* *उद्या 5जानेवारीस  दिवसभर चालणार शिबीर* पंढरपूर /प्रतिनिधी 

*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान*  *उद्या 5जानेवारीस  दिवसभर चालणार शिबीर*  पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर /प्रतिनिधी

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गादेगाव येथील ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर हे सिंहगड कॉलेज कोर्टी जवळ असलेल्या फाटे ट्रॅक्टर शोरूम या ठिकाणी होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून सदरचे शिबिर हे सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणार आहे.
   रक्तदान हेच जीवनदान असून, या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागेशदादा फाटे मित्रपरिवार आणि इतर कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपास्थित राहून रक्तदान करावे. असे आवाहनही ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय  समाजसेवी   संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.