*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचे वतीने नूतन नियुक्त अधिकाऱ्यांचा सन्मान !* ➖➖➖➖➖ *गादेगावचे  सुपुत्रासह पालकांचाही सन्मान*

*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचे वतीने नूतन नियुक्त अधिकाऱ्यांचा सन्मान !* ➖➖➖➖➖ *गादेगावचे  सुपुत्रासह पालकांचाही सन्मान*

पंढरपूर /प्रतिनिधी 

राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाचे , उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्यावतीने फाटे ट्रक्टर शोरूम कोर्टी. तालुका पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्यसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील उत्तीर्ण विद्यार्थ्याचा व त्यांचे  पालक यांचाही यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. 

   यामध्ये नवीन नियुक्ती झालेल्या कपिल भारत घोडके यांची सरळसेवेतून आरोग्यसेवक या पदासाठी निवड झाली आहे. तसेच सागर दिलीप जगताप यांची तलाठी (ग्राम महसूल अधिकारी ) या पदासाठी झाली आहे.तसेच कु. सुकेशनी औदुंबर गव्हाणे यांची पुणे ग्रामीण पोलीस हवालदार या पदासाठी निवड झालेली आहे. तसेच माणिकराव म्हस्के आरोग्य सहाय्यक , पंढरपूर तालुका आरोग्य पर्यवेक्षक यांची सेवानिवृत्ती निम्मित्त त्यांचा हि सत्कार व सन्मान करण्यात आला . 

या सत्कार प्रसंगी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव केला व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 
अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस – SP उद्योग आणि व्यापार विभागातर्फे स्पर्धां परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित मान्यवर 
ज्योतिर्लिंग बहुद्देशीय समाजसेवी संस्था गादेगाव उपाध्यक्ष डॉ. रमेश फाटे , विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी लिचे संचालक संजय पवार साहेब , भारत घोडके सर , दिलीप जगताप सर , औदुंबर गव्हाणे , गुजर साहेब , निवृत्ती पाटील , पुणेकर सर , ओमकर कठले , कुसुम घोडके , वर्षाराणी औदुंबर गव्हाणे , सुवर्णा दिलीप जगताप , रोहिणी सागर जगताप , जयश्री म्हस्के , साक्षी म्हस्के , आदमिले मॅडम उपस्थित होत्या.