*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राबविलाय स्तुत्य उपक्रम* *गावातील नागरिकांकडून दारूबंदीसाठी  बहुमत* 

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राबविलाय स्तुत्य उपक्रम*  *गावातील नागरिकांकडून दारूबंदीसाठी  बहुमत* 

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपुर तालुक्यातील  सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मौजे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारू विक्री व दारू दुकाने ताडी विक्री कायमची बंद करण्याबाबत रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ठरावाच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठरावबहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

           याप्रसंगी सरपंच संजय साठे उपसरपंच रूपाली कारंडे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे, तंटामुक्त अध्यक्ष संभाजी कदम , डॉ शिंदे,सुरेश टिकोरे, आबासो पवार ,विलास देठे, पोलीस पाटील इरकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे ,औदुंबर डोने, समाधान देठे ,गोवर्धन देठे, सागर सोनवणे ,आशाबाई देवकते, रेश्मा साठे, रोहिणी साठे, विजयमला वाळके, नंदकुमार वाघमारे,  सचिन वाळके, अनिल सोनवणे, महादेव पवार, सागर कारंडे, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे , भाऊ भोसले,माऊली देशमुख, बोला  शिंदे, सय्यद चाचा,  सागर महामुनी, पवार मॅडम, सुनीता जाधव, लता वेताळ, प्रियंका कवडे ,व ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो महिला भगिनी व शेकडो पुरुष मंडळी तसेच पोलीस खात्यातील अधिकारी महसूल खात्यातील अधिकारी पत्रकार बांधव विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
          अनेक वर्षापासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनुष्यवस्तीत दारू विक्री केली जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतकडे ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या. 
             याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सरपंच संजय साठे यांनी दारूबंदीचा धाडसी निर्णय घेतला." दारूवर टाकू बहिष्कार ,"व्यसनमुक्तीचा करू पुरस्कार" हे ब्रीद वाक्य घेऊन लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत वतीने रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन अण्णाभाऊ साठे प्रशाले समोर करण्यात आले होते. 
             यावेळी दारूबंदीबाबत ठराव मांडल्यानंतर उपस्थित सर्व मंडळी ग्रामस्थांनी हात वर करून दारूबंदी करण्याबाबत मतदान केले. 
      सदर ठरावाबाबतच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठराव बिनविरोध बहुमताने संमत करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी जयंत खंडाळे यांनी जाहीर केले. या विशेष ग्रामसभेनंतर सरपंच उपसरपंच यांनी सर्व सदस्यांचे सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. 
              चौकट


*समाजाचा तोटा होत असेल तर संवेदनशील मंडळींनी एकत्र आले पाहिजे:- महेशनाना साठे.* 
----------======---      -------------------------                  

कुटुंबातील कर्ता पुरुष जर व्यसनाच्या आहारी गेला तर सर्व कुटुंब उध्वस्त होते. समाजाचा तोटा होत असेल तर समाज व्यसनापासून दूर राहिला पाहिजे .यासाठी संवेदनशील मंडळींनी एकत्र आले पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तिने दारूबंदीचा समाजमान्य उपक्रम घेतल्याने येथील जनता चांगल्या कामाच्या पाठीशी उभी पाहिल्याने लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास महेश नाना साठे यांनी व्यक्त केला.