*बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून युवा वर्ग, शेतकरी शेतमजूर विविध स्तरांमधून प्रचंड मिळतोय पाठिंबा*  *रांजणी जिल्हा परिषद गटात बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून क्रांती करणार.....!* *रांजणी जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात-रामदास खराडे पाटील*  *मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेला संधी......?*

*बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून युवा वर्ग, शेतकरी शेतमजूर विविध स्तरांमधून प्रचंड मिळतोय पाठिंबा*   *रांजणी जिल्हा परिषद गटात बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून क्रांती करणार.....!* *रांजणी जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात-रामदास खराडे पाटील*   *मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेला संधी......?*

*करकंब /प्रतिनिधी*

माढा विधानसभेच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेल्या रांजणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्यांचं बरोबर अनेक शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे विशेषता विस्तारात काम करणाऱ्या लोकांचे हितचिंतकांचे आधारस्तंभ असलेले बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास सौदागर खराडे यांनी या रांजणी सोलापूर जिल्हा परिषद गटातून सोलापूर जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय मध्ये संधी मिळावी म्हणून आज पर्यंत त्यांनी केलेल्या प्रचंड कामाच्या जोरावर यशस्वीपणे या मिनी मंत्रालयात अर्थात सोलापूर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य तसेच शेतकरी वर्ग व केलेल्या कामाच्या विश्वासावर आणि त्यांच्या कार्यावर निश्चितपणे संधी निर्माण होईल असे राजकीय वर्तुळातून सध्या बोलले जात आहे.
रामदास सौदागर खराडे पाटील हे बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर या संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष असून त्यांनी आज पर्यंत राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी समजून विविध कार्यकारी सोसायटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप असो, तसेच शेतकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणी इलेक्ट्रिकल एन्टरप्रायजेस च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विजेची कामे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करून त्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले. माजी खा. कै.प्रतापसिंह मोहिते पाटील सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून या टेंभुर्णी रांजणी या जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना विविध मार्गाने अनमोल सहकार्य केले आहे. तसेच जिल्ह्याचे नेते व मा.आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय, व कै. सौदागर खराडे बहुद्देशीय कला क्रीडा संस्कृती शिक्षण प्रसारक मंडळ आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अध्यक्ष म्हणूनही या माध्यमातून या भागात अनमोल अशी कामगिरी सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना रामदास खराडे पाटील यांनी केली आहे.रामदास खराडे यांच्या माध्यमातून नेहरू युवा मंडळ या मंडळाला महाराष्ट्राचा उत्कृष्ट पुरस्कारही मिळाला आहे असे अनेक पुरस्कार या माध्यमातून लोकांमध्ये लोकप्रिय असलेले रामदास खराडे यांनी गावास व या जिल्हा परिषद गटात मिळवून गावाचा एक वेगळा आदर्श निर्माण करून राज्यात आगळा वेगळा पॅटर्न निर्माण केला असल्याने या रांजणी जिल्हा परिषद गटातून बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे यांनी ही निवडणूक लढवावी असा आग्रह रांजणी जिल्हा परिषद गट टेंभुर्णी जिल्हा परिषद गट या भागातील सर्वसामान्य लोकांबरोबरच शेतकरी वर्ग शेतमजूर व सर्व स्थरातील लोकांमधून होत आहे.*
  माढा तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद गट हा सर्वात महत्त्वाचा राजकीय केंद्रबिंदू असून या जिल्हा जिल्हा परिषद गटात अर्थात मिनी मंत्रालयामध्ये संधी प्राप्त करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामदास खराडे पाटील हे स्वतः इच्छुक असून 24तास अहोरात्र काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी शेतकरी शेतमजूर व विविध स्तरातील सामान्यांसाठी ही रांजणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार च असे स्पष्ट बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामदास खराडे पाटील यांनी सांगितले. रांजणी या जिल्हा परिषद गटातून मी माझ्या केलेल्या लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्याच्या जोरावर आणि माझ्या विश्वसनीय असलेल्या सहकाऱ्यांनी माझ्यावर असलेल्या विश्वासाने आज पर्यंत साथ दिल्यामुळेच या दत्तू कवडे आलेगाव, मच्छिंद्र व्यवहारे आढेगाव, शिवाजी कांबळे रूई, देविदास नवले भिमानगर, शिवाजी महाडिक, कृष्णा महाडिक, उत्तरेश्वर महाडिक, उत्तरेश्वर वाघमारे, दत्तात्रय साळुंखे, रामलिंग बोराटे, श्रीमती वंदना निंबाळकर आलेगाव खुर्द, पप्पू व्यवहारे वायरमन आढेगाव, माजी सरपंच राम टकले चांदज, समाधान काळे, शेवरे, विठ्ठल बाबा मस्के, बाबासाहेब मस्के, वसंत काळे शेवरे, संतोष पवार , नवनाथ शेंडगे , दत्तू काळे माळेगाव, श्रीराम लोंढे, टेंभुर्णी जिल्हाध्यक्ष चव्हाण, बाळू पवार, योगेश फरताडे, संतोष खैरमोडे, दत्ता खरात, माजी सरपंच शंकर बरगडे टेंभुर्णी, कालिदास लोंढे आदि पदाधिकारी कार्यकर्ते विश्वासनीय सहकारी असलेल्या या सहकाऱ्या सोबत या रांजणी जिल्हा परिषद गटामध्ये ही निवडणूक लढविणारच असे ठाम मत यावेळी बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामदास खराडे पाटील यांनी स्पष्ट केले.
या रांजणी जिल्हा परिषद गटामध्ये 17 गावे येत असून यामध्ये आठ पंचायत समिती गण येत आहेत. फुटजवळगाव, सुली, शिराळ, नगोली, उजनी, आढेगाव, रांझणी, आलेगाव बु. तसेच पंचायत समिती गन चांदज मध्ये नऊ गावे येत असून रुई, आलेगाव खुर्द, गार अकोले, टाकळी (टें), चांदज, वडोली, शेवरे, माळेगाव, मिटकलवाडी या सर्व भागातून सर्वसामान्यांतून रांजणी जिल्हा परिषद गटासाठी यामिनी मंत्रालयात रामदास खराडे पाटील यांनी नेतृत्व करावे अशी मागणी होत आहे.