*श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी नागेशदादा फाटे यांची तर व्हाईस चेअरमनपदी अण्णा यशवंत अण्णा नागटिळक यांची निवड* *श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पहिली सभा खेळीमेळीत संपन्न*
पंढरपूर/प्रतिनिधी
श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी नागेश एकनाथ फाटे यांची तर व्हाईस चेअरमनपदी अण्णा यशवंत नाकटिळक यांची एकमताने निवड करण्यात आली.
मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२४-२५ ते २०२९-३० बिनविरोध पार पडली.
यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एस. घोडके (सहाय्यक सहकारी संस्था अधिकारी, पंढरपूर)यांनी काम पाहिले.
यानंतर नूतन संचालकांची पहिली सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
याप्रसंगी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी नूतन चेअरमन नागेश एकनाथ फाटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी बांधिलकी व्यक्त केली. तसेच
संस्थेच्या सर्व सदस्य, मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी नूतन संचालक
हनुमंत नरहरी काळे, उमेश एकनाथ फाटे, अर्जुन ज्ञानेश्वर सावंत, अभिमन्यू विजयकुमार पवार, श्रीमती. प्रभावती पोपट फाटे, सौ. विद्युलता बाळासो बागल, औदुंबर सुधीर कांबळे, डॉ. रमेश एकनाथ फाटे, औदुंबर भगवान माने या सर्व नूतन संचालकांचा मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सुधाकर कवडे (माजी संचालक सहकार शिरोमणी कारखाना), ॲड. पांडुरंग चवरे, योगेश ताड (संचालक, सहकारी शिरोमणी साखर कारखाना), सत्यवान बागल सर, गणेश काका परदेशी, श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधीचे संचालक गोरख नाना बागल, संजय पवार, संजय बागल, शांतिनाथ बागल, हनुमंत फाटे सर, प्रभाकर बागल, डॉ. माणिक मस्के, समाधान फाटे, गुलाबभाई मुलाणी, मॅनेजर संग्राम कापसे, प्रदीप बागल, अनिल बागल, पोपट बागल, गणेश बागल, शुभम फाटे, ओंकार फाटे, वैजनाथ चवरे, संतोष पुणेकर, ओंकार कथले, समाधान बागल, ऋषिकेश बागल, समाधान कांबळे, आदमीले मॅडम, सुमित बागल, श्रीधर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.