*शिक्षण पंढरीतही स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्तम प्रतिसाद* /ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांनी पुण्यातील शिक्षकांच्या जाणून घेतल्या समस्या*
पुणे/प्रतिनिधी
राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया महिन्यावर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमामुळे राज्यात ज्ञानयात्री म्हणून ओळख झालेल्या स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे सर हे पुणे जिल्ह्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत आणि त्याला पुण्यातूनही प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. ज्याप्रमाणे स्वेरीतील विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होत आहे त्याचप्रमाणे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे भविष्यही उज्वल झाले पाहिजे, ही भावना शिक्षकांची झाली आहे.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.रोंगे सर यांनी गेल्या वर्षापासून पुणे विभाग मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सर्वत्र डॉ. रोंगे सरांचे भव्य स्वागत केले जात आहे.
या अनुषंगाने प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात मात्र कमालीची आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. रोंगे सरांची मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे, हे मात्र वाढत्या प्रतिसादावरून समजते. एकूणच डॉ. रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आहे तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून सुरू झालेल्या या काळात प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु असून त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबाबत डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी डॉ. रोंगे सरांचे कमालीचे स्वागत करत आहेत. मागील उमेदवारांनी फारसे काहीही केले नसल्याची भूमिका घेत आता डॉ. रोंगे सरांमुळे उत्साह वाढल्याचे दिसत आहे. एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील शाळांना भेट देऊन डॉ. रोंगे सरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी ज्ञानमंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आळे, ग्रामोन्नती शिक्षण मंडळ अंतर्गत सर्व महाविद्यालय, स्कूल, ग्रामविकास प्रतिष्ठान अंतर्गत सर्व महाविद्यालये, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बेल्हे, सह्याद्री व्हॅली कॉलेज राजुरी, जयहिंद महाविद्यालय, नारायणगाव यासह इतर शाळा व महाविद्यालय यांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. वास्तविक पाहता आमदार होण्यापूर्वीच डॉ. रोंगे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील एकूण २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. त्या अनुषंगाने त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नियुक्ती व सेवा विषयक एकूण ३७ प्रकरणे सोडवली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने कार्यवाही करत एकाच दिवसात ३७ प्रकरणांची सोडवणूक करून न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या कारणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत आहे. या भेटी दरम्यान बोलताना डॉ.बी.पी. रोंगे सर म्हणाले की ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी, समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते. परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण सेवा करण्याची संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाही त्यांनी दिली. या कारणांमुळे सर्वत्र डॉ. रोंगे सरांना प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. आमदार होण्यापूर्वीच त्यांनी कांही प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे डॉ. रोंगे सरांकडे पुणे विभागातील शिक्षक आशेने पाहत आहेत, हे मात्र नक्की जाणवते.