*श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा*

*श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा*

उदगीर /प्रतिनिधी 

 बी एन मराठा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथ रावजी चलवा प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी मुख्याध्यापक श्री राजाराम भोसले सहशिक्षक बालाजी सुवर्णकार माधव घुळे, प्रकाश भंडारे सेविका काशीबाई बिरादार उपस्थित होत्या .
याप्रसंगी सर्वप्रथम डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .यावेळी सर्व शिक्षकांनी देखील डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
 हा जयंतीचा कार्यक्रम सुरक्षित अंतर ठेवून उत्साहात साजरा करण्यात आला .या प्रसंगी मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्राध्यापक बाबुराव नवटकेत व संस्थेचे अध्यक्ष देविदासराव औटे यांनी देखील सर्व शिक्षकांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.