*करकबच्या समर्थ संदीप अभंगराव याची जवाहर नवोदय विद्यलयासाठी निवड*  *रामभाऊ जोशी प्रशालेचा विद्यार्थी*  *रामभाऊ जोशी प्रशाले ने केला विशेष सन्मान*.

*करकबच्या समर्थ संदीप अभंगराव याची जवाहर नवोदय विद्यलयासाठी निवड*  *रामभाऊ जोशी प्रशालेचा विद्यार्थी*  *रामभाऊ जोशी प्रशाले ने केला विशेष सन्मान*.


 करकंब/ प्रतिनिधी
 दयानंद शिक्षण संस्था नवी दिल्ली संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए. व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती जुनिअर कॉलेज करकंब ता पंढरपूर या प्रशालेचा विद्यार्थी चि. समर्थ संदीप अभंगराव. याची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड झाल्याने करकंब व परिसरातून कौतुक विशेषता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चि. समर्थ संदीप अभंगराव हा येथील रामभाऊ जोशी प्रशालेचा विद्यार्थी असून या यशस्वी विद्यार्थ्याला प्रशालेतील नवोदय विद्यालय परीक्षा प्रमुख एम के पुजारी सर, मनीषा ढोबळे मॅडम, अभिषेक चोपडे सर, संजय पाटील, एस व्ही दहिगिरे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे दयानंद शिक्षण संस्था सोलापूर चे स्थानीय सचिव श्री महेश चोप्रा साहेब, मुख्याध्यापक हेमंत कदम सर पर्यवेक्षक अनंत करळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वंजारी व सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.