संघाकडून मोदीजींचा अडवाणी होईल - अनंत गाडगीळ
पंढरपूर (प्रतिनिधी)
देशात आणि देशाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा घसरत चालली आहे, याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हर घडी विचार होत आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री नितिन गडकरी यांची स्तुती करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत भाजप सरकारवर पकड असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही कमाल आहे सध्याचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणखी घसरल्यास, त्यांचा अडवाणी होण्यास वेळ लागणार नाही असे भाष्य काँग्रेसचे अभ्यासू प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे त्यांच्या या विधानाने भाजप गोटातील नेत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ हे काँग्रेसचे अभ्यास नेते आहेत त्यांचा राजकीय अभ्यास चांगला आहे यामुळेच ते आजवर काँग्रेसचे प्रवक्ते राहिले आहेत केंद्र सरकार मधील सावळा गोंधळ वरचेवर वाढत असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होत असल्याचे दिसून येत असताना गाडगीळ यांनी अचानक मोठे राजकीय भाष्य केले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकार मधील नेत्यांना त्यांचे भाष्य हा निर्वाणीचा इशाराच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घसरत चाललेली लोकप्रियता आणखी घसरल्यास त्यांचा अडवाणी होण्यास वेळ लागणार नाही असे भाष्य गाडगीळ यांनी केले आहे त्यांच्या या वक्तव्याने भाजपा नेत्यांचे कान टवकारले आहेत
या विषयी बोलताना गाडगीळ यांनी अभ्यास पूर्व मत व्यक्त केले आहे या विषयी बोलताना ते म्हणाले की, संघाचे पुण्यातील मोतीबाग हे कार्यालय माझ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरच आहे. यामुळे मला संघाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करायला मिळतो. संघ कोणत्याही एका व्यक्तीला, मर्यादित लोकप्रियतेपेक्षा मोठे होवू देत नाही. गरज सरो वैद्य मरो या तत्वानुसार, प्रभुत्व गमवणाऱ्या व्यक्तीला संघ अलगदपणे बाजूला सारतो. हीच संघाची आजवरची कार्यपद्धती आहे.याचवेळी कोरोनाची पहिली लाट थोपवून धरल्याची केंद्रीय नेतृत्वाने केलेली भ्रामक कल्पना, स्तुतिसुमनांच्या घंटानादामुळे तज्ञांच्या ईशाऱ्याकड़े केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य, कुंभमेळा तसेच पाच राज्यांच्या निवडणूक आयोजनातून दाखविलेली अपरिपक्वता, त्यानंतर कृतीतील बेसावधपणा, यामुळे दूसरी लाट हाताबाहेर गेली.पाठोपाठ लसीकरण धोरणात उडालेला गोंधळ, लसीकरण प्रक्रियेचे फसलेले नियोजन, परदेशी औषध कंपन्यांना सुरवातीस नाकारण्यात आले. केवळ दोनच भारतीय कंपन्यांवर अवलंबून राहिल्याने, लसीकरणाचा वेगही मंदावला.अद्याप वीस टक्के भारतीयांचे लसीकरणही पूर्ण झालेले नाही . त्यातच, १०वी , १२ वीच्या परीक्षेच्या निर्णय बैठकीस शिक्षणमंत्र्याऐवजी संरक्षणमंत्र्यांना पाठविण्याचा विनोद, यावरून केंद्रात कश्याचाच ताळमेळ राहिला नसल्याचे आता स्पष्ट झाले असल्याची टीका गाडगीळ यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील शेकडो मृतदेहांच्या सामुदायीक दहनाचे परदेशी वृतपत्रांनी प्रसिद्ध केलेले फोटो, गंगेतून वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल विडिओ, यामुळे मोदींजीच्या प्रतिमेस तडा गेला आहे. यावर संघाला अखेर दिल्लीत चिंतन बैठक बोलवावी लागल्याचे सर्वश्रुत आहे. दुसरीकडे अचानकपणे नितिन गडकरी यांच्या विविध भाषणांचे व कार्याचे वीडियो व्हायरल होवू लागणे ही बाबही बरीच अर्थपूर्ण असल्याचे मत गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे. मोदीजींची लोकप्रियता आणखी घसरल्यास, ९० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अडवाणीजींना जसे संघाने कालांतराने बाजूला केले, त्याच प्रकारे संघ काही महिन्यात मोदीजींनाही बाजूला करेल ,असा राजकीय अंदाज गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.
चौकट
भाजप हा पक्ष संघाच्या इशाऱ्यावर चालतो हे आता सर्वज्ञात झाले आहे.संघ सांगेल तीच पूर्वदिशा भाजप नेत्यांना मानावी लागते.संघाच्या याच ताकदीने भाजपनेते कै . लालकृष्ण अडवाणी यांना अचानक राजकीय प्रवाहातून बाहेर ढकलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घसरत चाललेली लोकप्रियता ,आणखी घसरल्यास मोदींजींचा अडवाणी होण्यास वेळ लागणार नाही, अशी टिपण्णी काँग्रेसचे प्रवक्ते माजी आ.अनंत गाडगीळ यांनी केली आहे.त्यांच्या या विधानाने भाजप नेत्यांचे कान चांगलेच टवकारले आहेत.