*फेसबुकच्या जमान्यात शाळा मास्तर फसला!* *मोह न आवरता भेटायला  गेलेल्या शिक्षकास खावा लागला मार* *जवळचे १० ताेळे साेने अन हजारोची रोख रक्कमही लंपास* *मुबलक पगारीचाच दुष्परिणाम असल्याने शिक्षकी पेशा होतोय मोठा बदनाम*

*फेसबुकच्या जमान्यात शाळा मास्तर फसला!*  *मोह न आवरता भेटायला  गेलेल्या शिक्षकास खावा लागला मार*  *जवळचे १० ताेळे साेने अन हजारोची रोख रक्कमही लंपास*  *मुबलक पगारीचाच दुष्परिणाम असल्याने शिक्षकी पेशा होतोय मोठा बदनाम*

 पंढरपूर /प्रतिनिधी

 फेसबुकच्या जमान्यात अनेकजण जाळ्यात अडकतात. अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक यांच्या बाबतीत घडली आहे. यामुळे मुबलक पगारीचा मोठा  दुष्परिणाम  भोगावा लागला आहे. यामुळे शिक्षकी पेशा बदनाम झाला आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोशल मिडियावर फ्रेंड रिक्वेस्ट टाकली, 
चॅटिंग सुरू झाले. पंढरपूर तालुक्यातील शाळा मास्तरला 
त्या महिलेने कोरफळे (ता. बार्शी) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकास भेटायला बोलावून,चोप देऊन, १० तोळ्याच्या दागिन्यांसह २७ हजार रुपये रोख व मोबाईल लंपास केला.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यामधून महिला स्वाती भोसले, सच्या, अमल्या, एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 
अण्णा वाघमारे 
 (वय ४६, रा. कोर्टी, ता. पंढरपूर) शिक्षकाने फिर्याद दाखल केली.

     ही घटना कोरफळे शिवारात दुपारी दीड वाजता घडली.

आनंदनगर टाकळी (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक अण्णा वाघमारे यांना १४ सप्टेंबर २०२४ रोजी सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट आली. 

त्यानंतर चॅटिंग सुरू झाले. स्वाती भोसलेने तिचा मोबाईल नंबर दिला. परत व्हॉट्सअॅप चॅटिंग सुरू झाले. आमच्यात जवळीक वाढल्याने  सायंकाळी सात वाजता कोरफळे येथे भेटण्यासाठी या असे व्हि.डि.ओ. कॉल करून म्हणाली.त्यावेळी मी उद्या येतो, असे सांगितले. 

माझा मित्र संजय राऊत
 (रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे दोघेजण माझ्या एम.एच. १३/डी.एफ. ९५५५ या चारचाकी वाहनाने कोरफळे येथे गेलो. 
त्यावेळी जाताना रस्त्यामध्ये दोन-तीन व्हि.डि.ओ. कॉल झाले होते. आम्ही दुपारी एक वाजता कोरफळे येथे पोचलो होतो. व्हि.डि.ओ. कॉल सुरू असतानाच मित्राला गावातच सोडून तुम्ही एकटे पानगाव रस्त्याने या असे सांगताच दोन किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला स्वाती भोसले उभी होती. तिला गाडीमध्ये बस, असे म्हणताच तिने सच्या, अमल्या अशी हाक मारली.
त्यानंतर तिघेजण पळत आले.मारहाण करून मला गाडीच्या बाहेर काढून शेतामधील झाडाखाली नेले तिथे मारहाण केली.अंगावरील चार तोळ्याचे ब्रेसलेट, चार तोळ्याची चेन, दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल, रोख २७ हजार रुपये काढून घेतला.

    यावेळी हा प्रकार सुरु असताना जवळच शेळ्या राखणारा शेतकरी तरुण सूरज तेथे आला. सूरजने आमच्या शेतात तुम्ही काय करता ? म्हणून त्यांना शिव्या दिल्या व दगडे मारू लागला.
 त्यावेळी सर्वजण दोन दुचाकीवर निघून गेले, 
असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे करीत आहेत.