*करकंब पोलिसांचा पट.कुरोली येथे जुगारावर छापा.* *सुमारे एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत.*

*करकंब पोलिसांचा पट.कुरोली येथे जुगारावर छापा.*  *सुमारे एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत.*

करकंब/प्रतिनिधी:-

करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील पट.कुरोली ता. पंढरपूर येथे 52 पत्त्याच्या जुगार सुरु असताना करकंब पोलिसांनी छापा टाकून सुमारे 96,हजार 150 रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
   पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दि.11/06/2023 रोजी सायंकाळी 5 वा च्या सुमारास पट.कुरोली ता. पंढरपूर येथे काही इसम गोलाकार बसून 52 पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार पैज लावून खेळत असताना रोख रक्कम व 52 पत्त्यांचे 2 डाव व 5 मोटारसायकल सह मिळून आले आहेत याबाबत फिर्याद करकंब पोलीस स्टेशनचे पोना - मयुर गव्हाणे यांनी दिली आहे.संशयित आरोपी कडून 96,150/- रू रोक रक्कम त्यामध्ये 100 रुपये दराची 5 नोट, 200 रुपये दराच्या 2नोटा,50 रुपये दराच्या 04,नोटा 10 रुपये दराच्या 05 नोटा 
,00:00 रुपये किमतीचे 52 पत्त्याचा दोन डाव .                            ,20,000:00 रुपये किमतीचे एक काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल तिचा नंबर mh13/av-9948.                                           ,20000:00 रुपये किमतीचे एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची मोटर सायकल तिचा नंबरmh45/p-4797 अशी                                ,20,000:00 रुपये किमतीचे एक काळ्या रंगाची हिरो पॅशन कंपनीची मोटर सायकल विना नंबरची अशी .                                     ,15000:00 रुपये किमतीचे एक काळ्या  रंगाची बजाज डिस्कवर कंपनीची मोटरसायकल तिचा नंबरmh10/au-5928                                           ,20,000/रुपये किमतीचे एक काळ्या रंगाची बजाज सिटी हंड्रेड कंपनीची मोटार सायकल तिचा नंबरmh13/dh-5162  असा एकूण                                                                                    96,150 /-एकूण किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पुढील तपास करकंब पोलीस स्टेशन चे सपोनि निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोना संतोष पाटेकर हे करीत आहेत.