*राष्ट्रवादी पक्षाकडून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सन्मान* *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिल्या मान्यवर मंडळींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा*
पंढरपूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याची संधी मिळालेल्या तसेच क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवर मंडळींचा सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे पार पडला.
पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील विविध कर्तृत्ववान मान्यवरांनी संघटनांच्या पदावर निवड होऊन कार्यभार स्वीकारला आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय संपादन केले आहे. या मान्यवर मंडळींचा सत्कार समारंभ पार पडला.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड केंद्रीय कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल किरणराज घाडगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच नूतन संभाजी ब्रिगेड पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बागल, आष्टी तालुका मोहोळ विविध कार्यकारी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन धनंजय गुंड, महाराष्ट्र पोलिस कोल्हापूर विभाग गणेश मोरे,
एलएलबी मध्ये उत्तम यश मिळवल्याबद्दल महादेव बागल, एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय निवड झाल्याबद्दल कु. सृष्टी नितीन बागल, एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय निवड झाल्याबद्दल सुरेश गळवे, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. श्रद्धा विजायकुमार मेलगे, खेड भाळवणी येथे नूतन सरपंच संतोष साळुंखे, खेड भाळवणी येथे उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण साळुंखे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी किरण घाडगे, बाळासाहेब बागल, महादेव बागल, डॉ. मस्के आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. रमेश फाटे, संजय बागल, शांतिनाथ बागल, संतोष गुंड, बापू मलगे, नितीन बागल, मोहन गुजर, शुभम फाटे, शशांक फाटे, संतोष पुणेकर, ओंकार कथले, समाधान बागल, ऋषिकेश बागल, समाधान कांबळे, किशोर नपते आदी उपस्थित होते.