*राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यासाठी पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी* *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच्या निवडणूक समितीच्या कोअर कमिटी सदस्यपदी नागेश फाटे यांची नियुक्ती*

*राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यासाठी पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी*  *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच्या निवडणूक समितीच्या कोअर कमिटी सदस्यपदी नागेश फाटे यांची नियुक्ती*

पंढरपूर /प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पक्षाच्यावतीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. 
या समितीच्या कोअर कमिटी सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, सागर पडगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी नुकतेच प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायत तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाले असून दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी निकालाची प्रक्रिया पार पडणार आहे.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकतीच अकलूज येथे माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. याप्रसंगी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, मोहोळ चे आमदार राजू खरे, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार रमेश कदम, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत, बाबुराव गायकवाड, सुरज देशमुख, सुवर्णाताई शिवपुरे, विनंती कुलकर्णी, बाळासाहेब शेख, धनंजय साठे उपस्थित होते.