*दिलीपबापूंचे कार्य आणि माहेरची साथ यावरच नशीब आजमाविण्याची तयारी!* *विठ्ठल परिवाराचा मेळ  घालण्यासाठी घेतलं दोन पावले मागे*  *सौ माधुरीताई धोत्रे  यांची नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १७ ब मधून उमेदवारी*

*दिलीपबापूंचे कार्य आणि माहेरची साथ यावरच नशीब आजमाविण्याची तयारी!*  *विठ्ठल परिवाराचा मेळ  घालण्यासाठी घेतलं दोन पावले मागे*   *सौ माधुरीताई धोत्रे  यांची नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १७ ब मधून उमेदवारी*

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर नगरपालिकेवर सत्तांतर घडवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असलेले मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी, विठ्ठल परिवाराचा मेळ व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले होते. त्यामध्ये त्यांना यशही मिळाले आहे. यासाठी नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असलेल्या त्यांच्या पत्नी सौ माधुरीताई दिलीप धोत्रे यांनी स्वतः चार पावले मागे घेत प्रभाग क्रमांक १७ ब मधून नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे.   
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सर्व नेतेमंडळींना एकत्रित करीत विठ्ठल परिवारातील नेते भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉ प्रणिताताई भालके यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी एकमत करून दाखविले होते. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी डॉ. प्रणिताताई भालके यांनीही रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सौ माधुरीताई धोत्रे यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे वतीने नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
    प्रभाग क्रमांक १७ हा सौ माधुरीताई धोत्रे यांचे बंदपट्टेच्या घरातील माहेर  असलेला परिसर आहे. या भागात मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनीही  अनेक  कामे केली आहेत. त्यामुळे धोत्रे परिवाराचाही दांडगा जनसंपर्क या प्रभागांमध्ये दिसून येत आहे.
   या भागामध्ये महात्मा फुले पुतळा परिसर ,गुजराती कॉलनी परिसर, जगदंबा वसाहत परिसर ,ढोर गल्ली, कैकया समाज ,नगरपालिका शाळा नंबर ७ची पिछाडी बाजू , सुडके गल्ली, डॉ. सातपुते हॉस्पिटल परिसर, ओतारी गल्ली, महापौर चाळ बडवेंचर झोपडपट्टीतील काही भाग या भागातील मतदार आहेत. यामुळे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी कायम या भागासाठी मदतीचा हात दिला होता. याची उतराई म्हणून या भागातील मतदार सहकार्य करतील. यामुळेच सुरक्षित प्रभाग पाहून दिलीप धोत्रे यांनी आपल्या पत्नी सौ माधुरीताई दिलीप धोत्रे यांना निवडणुकीत उतरविले आहे.
   सत्ताधारी परिचारक गटाला विरोध करीत कायम विकास कामांसाठी अनेक वेळा नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. चुकीच्या कामाबाबत आवाज उठवला होता. त्यासाठी कामाचा माणूस म्हणून या भागातील मतदार माझ्या पत्नीला विजयी करतील असा विश्वासही मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.