*नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार सौ.शामल शिरसाट यांच्या प्रचाराचा शुभारंभ* *पंढरपूर रामबाग येथील श्रीराम मंदिरातून प्रचाराची सुरुवात*
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसट यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. हा प्रचार अंबाबाई पटांगण परिसरातील रामबाग येथील श्री रामचे दर्शनाने प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे भाजप नगराध्यक्ष पदासाठी कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी परिचारक यांचे निष्ठावंत पाईक असलेले पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाठ यांच्या सुविद्य पत्नी सौ शामल शिरसट यांना उमेदवारी जाहीर केली.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि मंगळवारपासून प्रचाराचा शुभारंभ ही करण्यात आला.
मागील ४० वर्षापासून शिरसट कुटुंब राजकारणात सहभागी आहे. शामल शिरसट यांचे पती लक्ष्मणभाऊ शिरसट व मुलगा नगरसेवक विक्रम शिरसट यांनी नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून काम केले
आहे. शिरसट यांचे पंढरपूर शहरातील मतदारांची चांगले संबंध आहेत.गेल्या ४० वर्षापासून त्यांनी त्यांच्या
प्रभागामध्ये विविध विकासकामे केली आहेत. गोरगरिबांना मदत केली आहे. यामुळे या निवडणुकीत शिरसट यांचे नाव असल्याचे दिसून येत आहे.
शिरसट यांच्या पाठीमागे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठी ताकद उभी केली आहे. तर किंगमेकरची भूमिका उमेश परिचारक बजावीत आहेत. पंढरपूर शहरांमध्ये ओबीसी मते जास्त असल्यामुळे भाजपने राजकीय खेळी करून ओबीसी असलेल्या शामल शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसाट यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असल्याचे दिसून येत आहे.