*करकंब मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन. तिघावर गुन्हा दाखल*
करकंब /प्रतिनिधी.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने करकंब येथील तीन व्यावसायिकावर करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी बिगर अत्यावश्यक सेवा असणारी दुकाने उघडी ठेवल्याने संबंधित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक 7/8/2021 रोजी करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे व त्यांच्यासोबत पोलीस हवालदार रमेश जाधव पोलीस नाईक सज्जन भोसले, खांडेकर , गरजे हे करकंब गावामध्ये पेट्रोलिंग करीत असताना बिगर अत्यावश्यक सेवा दुकाने उघडी असल्याने येथील कृष्णा फुटवेअर ज्ञानेश्वर शिंदे एसटी स्टँड जवळ, हॉटेल दर्शन. लक्ष्मी भोसले, एशियन पेंट्स गोपाळ कुंभार बागवान गल्ली करकंब यांच्यावर भा द वि 188 269 साथीचे रोग अधिनियम 51ब कवड ॲक्ट 11 या कायद्यानुसार पोलीस ठाणे अंमलदार पोलीस नाईक सुरेश एकतपुरे यांनी यातीन दुकानदारावर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस नाईक अरुण कोळवले यांच्याकडे दिलेला आहे. करकम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रशांत पाटील यांनी सध्या पंढरपूर तालुक्यात कोरोना ची वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे प्रतिबंधात्मक उपयोजनाचे दिलेल्या आदेशाचे सक्तीने अंमलबजावणी करणेबाबत जनतेला आव्हान करण्यात आले असून यापुढे तोरणा नियमांचे काटेकोरपणे पालन करून नियमांचे उल्लंघन करणारे बिगर अत्यावश्यक सेवा मधील हॉटेल धाबे इतर कोणावर कारवाई करून गुन्हे दाखल येणार असल्याची माहिती दिली.