*जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी* *पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी, शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील*

*जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी*  *पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी, शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील*

पंढरपूर  / प्रतिनिधी  

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन (महाराष्ट्र- दिल्ली) संघटनेच्या सोलापूर जिल्हा तसेच पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी निवडीसंदर्भात रविवारी पंढरपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 
यावेळी संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी, पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी तर पंढरपूर शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 
नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे ५ वे राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूर येथे होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली.
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन ही संघटना वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असून, "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" या ध्येयाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. 
गेल्या पाच वर्षांमध्ये संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नांवर आवाज उठवून जनतेच्या न्याय हक्कांसाठी भरीव कार्य केले आहे.
संघटनेचे राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून संघटनेचे जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी कल्याण कुलकर्णी यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. तसेच पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी आणि शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मानवाधिकार चळवळीला अधिक बळकटी देत समाजातील वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांच्या न्याय व अधिकारासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला. संघटना आगामी काळात विविध सामाजिक, जनजागृती व मानवाधिकार संरक्षणाशी संबंधित उपक्रम राबविणार असल्याची माहितीही यावेळी  देण्यात आली.