*सावंत पुन्हा निवडणुकीच्या मैदानात ; राजकीय पक्षाच्या उमेदवारीचे संकेत* *शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच ठेवणार असल्याची पंढरपूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची भूमिका*

*सावंत पुन्हा निवडणुकीच्या मैदानात ; राजकीय पक्षाच्या उमेदवारीचे संकेत*  *शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच ठेवणार असल्याची पंढरपूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची भूमिका*

पंढरपूर /प्रतिनिधी 

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपण राजकीय पक्षाच्या उमेदवारीतून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

सावंत म्हणाले, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित चळवळ नाही. निवडणुकीत विजय-पराजय काहीही झाले तरी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपला लढा सुरूच राहणार आहे. 

शिक्षकांचा स्वाभिमान कोणत्याही दबावापेक्षा मोठा आहे. शिक्षकांनी स्वाभिमानाने मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जुनी पेन्शन, टप्पा अनुदान, TET, आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांचे प्रश्न हे आगामी काळातील प्रमुख मुद्दे असल्याचे सावंत यांनी सांगितले.

जुनी पेन्शन योजनेसाठी सर्वोच्च न्यायालयातील लढा सुरू असून, टप्पा अनुदानाचा प्रश्नही शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीसाठी उरलेल्या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सक्रियपणे संपर्क वाढवावा. प्रत्येक कार्यकर्त्याची ही निवडणूक असून, शिक्षकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेले कार्यकर्ते, शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.