*पंढरीतील  किंगमेकर हिम्मत आसबे यांची आ. प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट!* *आसबे परिवाराकडून यथोचित सन्मान*

*पंढरीतील  किंगमेकर हिम्मत आसबे यांची आ. प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट!*  *आसबे परिवाराकडून यथोचित सन्मान*

पंढरपूर/प्रतिनीधी

पंढरपूर तालुक्यात राजकारणातील किंगमेकर असलेले उद्योजक हिम्मत आसबे यांच्या घरी जावून सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी आवर्जून भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान आसबे परिवाराचे वतीने आ. प्रणिती शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.
 आ. प्रणिती शिंदे यांचा आज शुक्रवारी पंढरपूर परिसरात प्रचार दौरा होता. यामध्ये त्यांनी आवर्जून वेळ काढून उद्योजक हिम्मत आसबे यांच्या घरी जावून या निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्याला आसबे परिवार यांनीही सहमती दर्शविली आहे. यामुळे पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून आ.प्रणिती शिंदे यांना मोठ बळ मिळणार आहे.
   पंढरपूर येथील आसबे यांना मानणारा परिवार मोठा आहे. उद्योजक हिम्मत आसबे यांनी पंढरपूर तालुक्यातील आजवर झालेल्या अनेक निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. या ताकदीच्या जोरावर अनेकवेळा विजय मिळवून दिला आहे.
   यापूर्वी पंढरपूर तालुक्यात स्व. वसंतराव काळे यांचे राजकीय प्राबल्य वाढले होते. त्यामध्ये याच आसबे परिवाराचे मोठ योगदान होते. कालांतराने काळे यांच्या निधनानंतर स्व.आ. भारतनाना भालके यांचे या तालुक्यात राजकीय अस्तित्व पुढे येत असतानाही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत याच आसबे परिवाराने साथ दिली होती.
     स्व. भारतनाना भालके यांचे निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आसबे परिवार आ. समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभा राहिला होता. त्यावेळी प्रचंड मोठी खेळी खेळत आवताडे यांनाही विजय मिळविण्यासाठी आसबे परिवाराचे मोठे योगदान होते. 
      अशाप्रकारे नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाना निवडणुकीत कायम आसबे परिवाराची किंगमेकर म्हणून भूमिका पहावयास मिळाली आहे.
     वरील सर्व निवडणुका आणि आसबे परिवार यांची ताकद पाहता. ही सर्व ताकद आता आ प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय होणार आहे.याचा आ. प्रणिती शिंदे यांना मोठा फायदा होणार आहे.
          यावेळी  दिलीप कोरके,  प्रशांत शिंदे ,
संदीप पाटील, मुसाभाई इनामदार ,सचिन डोईफोडे, विक्रांत आसबे , अरुण फाळके साहेब , काटे सर, लोखंडे सर , संजय घुले,  अनिल घुले, भारत जगताप,  कुमार कडलासकर, अशोक साखरे, यांचेसह  समतानगर मधील सर्व प्रतिष्टीत नागरिक आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.