*शिष्यवृत्ती परिक्षेत रामभाऊ जोशी हायस्कूल चे यश*   *  *चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड*.

*शिष्यवृत्ती परिक्षेत रामभाऊ जोशी हायस्कूल चे यश*    *  *चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड*.

करकंब /प्रतिनिधी :

           महाराष्ट्र राज्य परीक्षा     परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शिष्यवृत्ती प्राप्त केली.
      प्रशालेतील इयत्ता आठवीतील  कु. गौरी रमेश ढोबळे व  आदर्श नितीन शेटे तसेच  इयत्ता पाचवीतील  आदित्य नितीन शेटे, शार्दुल महेंद्र फासे  हे शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. 
या सर्व विद्यार्थ्यांना सौ. मनिषा ढोबळे ,  संजय पाटील, अभिषेक  चोपडे, सुरेश दहीगिरे,   दुधाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्था, सोलापूरचे स्थानिय सचिव  महेश चोप्रा , प्रशासकीय अधिकारी डॉ. विजयकुमार उबाळे , प्रशालेचे प्राचार्य  हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे , शालेय शैक्षणिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.