*उद्या खा.प्रणिती शिंदे पंढरीत येणार* *महाविकास आघाडीचा दाते मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळावा*
पंढरपूर/प्रतिनीधी
सोलापूर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले होते. त्यामुळे त्यांना पंढरपूर भागातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे याच कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी गुरुवारी येथील दाते मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी 13जून रोजी सकाळी ११वाजलेपासून हा मेळावा सुरू होणार आहे. कार्यकर्त्यासाठी प्रीती भोजनही ठेवण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस कडून कळविण्यात आले आहे. तरी पंढरपूर शहर आणि परिसरातील सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहनही काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.