*भाजपचे उमेदवार शामल शिरसट यांची प्रचारात मोठी आघाडी*   *नेत्यांसह मतदारांशीही थेट संवाद हीच आहे पापरकर यांची आहे मोठी जमेची बाजू*

*भाजपचे उमेदवार शामल शिरसट यांची प्रचारात मोठी आघाडी*    *नेत्यांसह मतदारांशीही थेट संवाद हीच आहे पापरकर यांची आहे मोठी जमेची बाजू*

पंढरपूर/ प्रतिनिधी 

पंढरपूर शहरात नगरपालिका  निवडणुकीचा रंग आता चांगलाच भरला असून ,प्रचारात खऱ्या अर्थाने रंग भरत आहे.
भाजप या सत्ताधारी सक्षम पक्षाकडून सौ शामल लक्ष्मण शिरसट या नगराध्यक्ष पदासाठी लढत असून त्यांच्या विरोधात डॉ प्रणिता भालके आहेत, मात्र सुरुवातीपासूनच नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर मतदारांशी थेट संवाद यामुळे सध्या तरी शामल शिरसट यांची प्रचारात मोठी आघाडी असल्याचे दिसत आहे.

   मंगळवार दि२५नोव्हेंबर रोजी सकाळी प्रदक्षिणा मार्ग, कालिकादेवी चौक, भाई भाई चौक, संत पेठ भागात भव्य रॅली काढण्यात आली यावेळी या भागातील स्थानिक लोकांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लढणाऱ्या सौ श्यामल शिरसट यांचे स्वागत केले, ढोल ताशाच्या गजरात, हलग्यांच्या कडकडाटात जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे,
भाजप पक्षाची देशात आणि राज्यात सत्ता आहे.
विविध विकासाची कामे सुरू असून भाजप आली तर पंढरपूर येथे विविध विकासकामे होणार असल्याने संत पेठ भागात नागरिकात उत्साह दिसून येत आहे.
यावेळी भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक, लक्ष्मण शिरसट,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्यामल शिरसट, माजी नगरसेवक राजू सर्वगौड , इब्राहिम बोहरी या भागातील नेते, युवक, माता भगिनी उपस्थित होते.