*करकंब सह 42 गावाकडे आमदार बबनदादा शिंदे यांचे दुर्लक्ष..*..!
करकंब/ प्रतिनिधी:
गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये कोरणा संसर्ग विषाणूच्या संदर्भात माढा तालुक्याचे पाणीदार आमदार बबन दादा शिंदे तसेच त्यांचे सुपुत्र माढा पंचायत समितीचे माजी सभापती रणजितसिंह शिंदे यांनी करकब व करकंब सह 42 गावाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या भागातून आमदार बबनदादा शिंदे यांच्या विषयी तीव्र नाराजी लोकांमधून व्यक्त केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुका असल्या की आमदार यांची यंत्रणा जशी कामाला लागते, त्याप्रमाणे आमदार साहेबांनी गेल्या दोन वर्षात करकंब सह 42 गावातील शेतमजूर, बांधकाम मजूर, शेतीविषयक व्यापारी, व्यापारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, ज्यांची हातावर पोट आहे, असे व्यवसायिक. विशेषता महिलावर्ग, महिला बचत गट, आदीं लोकांसाठी कोणतीही उपाययोजना आपल्या यंत्रणेचा उपयोग केला नसल्याचे सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.
करकंब आणि 42 गावातील असलेल्या प्रचंड समस्यांचा डोंगर अनेक वर्षापासून होता व आजही आहे. करकंब च्या पूर्व भागातील शेतकरी करकंब गाव तळ्यात मोडनिंब वितरी केतून पाणी सोडण्यास संदर्भात असलेला प्रश्न, करकंब व 42 गावातील जिल्हा परिषद राज्य मार्ग राष्ट्रीय मार्ग तसेच गावातील अंतर्गत मार्ग रस्ते याबाबत असलेला निधीचा ज्वलंत प्रश्न लोकप्रतिनिधी पुढे असूनही याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे हे ज्वलंत प्रश्न उभे असताना दुसरीकडे जगण्याची भ्रांत कशी करावी अशा विवेचनात सर्वसामान्य नागरिक मात्र भरकटला जात आहे, अशातच लोकप्रतिनिधींचे करकंब व 42 गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.