*उद्या पंढरीत भालके गटाची बैठक* *जि. प. अन् पं. स. निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या होणार मुलाखती* 

*उद्या पंढरीत भालके गटाची बैठक*  *जि. प. अन् पं. स. निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या होणार मुलाखती* 

पंढरपूर/प्रतिनिधी 

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरदार व्हावे लागले आहेत पंढरपूर तालुक्यातही विविध राजकीय पक्ष आणि गटातटाच्या वतीने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील भलके गटाने ही आपली उमेदवार रिंगणात उतरवणेच्या दृष्टीने तयारी सुरू ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी दिली आहे. 
         या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पंढरपूर येथील भालके यांचे कोर्ट परिसरात असलेल्या निवासस्थानी होणार आहेत. रविवारी सकाळी ९वाजता कासेगाव, लक्ष्मी टाकळी गोपाळपूर, जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. दुपारी ३वाजता करकब ,भोसे ,रोपळे, भाळवणी ,वाखरी या गटातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. 
   या बैठकीसाठी गावातील प्रमुख नेतेमंडळी आणि इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे .असे आवाहनही भालके यांच्या वतीने करण्यात आले आहे.