*ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांना दिला खंडाळ्यातही शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद*

*ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांना दिला खंडाळ्यातही शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद*

सातारा/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया महिन्यावर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ज्ञानयात्री म्हणून ओळख निर्माण झालेले स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे सर हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत आणि त्यांच्या दौर्‍यांना प्रचंड प्रतिसाद देखील लाभत आहे. ज्याप्रमाणे डॉ. रोंगे सरांच्या प्रयत्नांतून ‘स्वेरी’ला यश लाभले त्याचप्रमाणे खंडाळा तालुक्यात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटावे आणि त्यांच्या शिक्षण कार्यात यशस्वी व्हावे, ही अपेक्षा आहे. एकूणच शिक्षकांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी डॉ. रोंगे सरांकडे एका वेगळ्या आशेने पाहिले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 
          गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.रोंगे सर यांनी गेल्या वर्षापासून पुणे विभाग मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सर्व ठिकाणी डॉ. रोंगे सरांचे भव्य स्वागत केले जात आहे. या अनुषंगाने प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून ते जवळपास प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचले असल्याचे दिसून येत आहे. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. रोंगे सरांची विविध प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे. एकूणच डॉ. रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आहे तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु असून त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबाबत डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी डॉ. रोंगे सरांचे कमालीचे स्वागत करत आहेत. आत्तापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नांवर फारसे काही केले नसल्याचे जाणवते. त्यामुळे आता डॉ. रोंगे सर यांच्या कामाची पद्धत विकासाकडे नेणारी आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये उत्साह पसरला आहे. एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील जवळपास १२ शाळा- महाविद्यालयांना भेटी देऊन डॉ. रोंगे सरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी ज्ञानसंवर्धिनी प्रशाला शिरवळ, भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव, आदर्श विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिरवळ, एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूल शिरवळ, प्रगती हायस्कूल शिरवळ, श्रीपतराव कदम जुनिअर कॉलेज शिरवळ, शिंदेवाडी माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी, ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल शिरवळ, श्री समर्थ विद्यामंदिर कण्हेरी, पंचक्रोशी विद्यालय जवळे- लोहोम फाटा, यांसह इतर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. वास्तविक पाहता आमदार होण्यापूर्वीच डॉ. रोंगे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील एकूण २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. त्या अनुषंगाने त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नियुक्ती व सेवा विषयक एकूण ३७ प्रकरणे सोडवली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने कार्यवाही करत एकाच दिवसात ३७ प्रकरणांची सोडवणूक करून न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या कारणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत आहे. या भेटी दरम्यान बोलताना डॉ.बी.पी. रोंगे सर म्हणाले की ‘आज शिक्षण क्षेत्रात व शिक्षकांसमोर अनेक प्रश्न व अडचणी आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी सक्षम आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते. परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपली सेवा करण्याची संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाही त्यांनी दिली. या कारणांमुळे सर्वत्र डॉ. रोंगे सरांना प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. आमदार होण्यापूर्वीच त्यांनी कांही प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे डॉ. रोंगे सरांकडे पुणे विभागातील शिक्षक आशेने पाहत आहेत, हे मात्र नक्की जाणवते.