*आज पुणे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार आ. दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूरात*
पंढरपूर,/ प्रतिनिधी
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२६ साठी विद्यमान आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर येथून होत आहे.
सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संत नामदेव पायरी, पंढरपूर येथे प्रचार शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंढरपूर तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार सावंत सर हे 'अखंड कामात सदैव शिक्षकांत' या भावनेतून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवत आहेत. जुनी पेन्शन, वेतन त्रुटी, अनुदानाचा प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात सावंत सरांना शिक्षकांचा मोठा पाठिंबा आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूरातून नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करणे हा शुभ संकेत मानला जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.