*शिवजयंती निमित्ताने "जागर"स्वच्छता अभियानाच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने करकंब गाव करत आहे स्वच्छ आणि सुंदर.....*!

*शिवजयंती निमित्ताने "जागर"स्वच्छता अभियानाच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने करकंब गाव करत आहे स्वच्छ आणि सुंदर.....*
*करकंब/प्रतिनिधी*
-शिवजयंती निमित्ताने दिनांक १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान "जागर"स्वच्छता अभियान टीम व करकंब ग्रामस्थांचे वतीनं तीन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शुक्रवार सकाळी सुरूवातीला ग्रामदेवत कनकंबा मातेचा आशिर्वाद घेऊन मंदिर परिसरातील काटेरी झुडप काढण्यास सुरुवात झाली. यावेळी तीन दिवस जेसीपीच्या सहाय्याने गावातील सर्व चिलार बाभळींची झाड काढण्यात आली,व त्या बाभळी व कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावली.याकामी सर्व ग्रामस्थांनी जेसीपी देऊन सहकार्य केले,तीन ३ते ६ या वेळेत सर्व ग्रामस्थ,जागर स्वच्छता टीम व स्वच्छता दुत महिला, करकंब गावच लेकीचं झाड अभियान टीम, अमोल शेळके विद्यालय यांचे विद्यार्थी यांचे वतीनं संपूर्ण गाव स्वच्छ सुंदर करण्याच स्वच्छतेच महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आले.तीन दिवसात सर्व ग्रामस्थांना स्वच्छतेच्या बाबतीत दक्षता घेण्यासाठी जनजागृती करून आपला घराचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित केले. बघता बघता गाव सुंदर झाल्याने सर्व करकंब करांनी या अभियानाचे कौतुक केले.यानंतरही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी ३ते ६ यावेत हे अभियान अविरत चालणार असून सर्व करकंब ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे अवाहन "जागर"टीमच्या वतीनं करण्यात येत.या अभियानास अनेक दानशूर व्यक्तिंनी संस्थांनी पदाधिकारी यांनी वस्तूरुपान,श्रमदानान,अथवा अर्थिक सहकार्य करून सहकार्य केले.तसेच या अभियानाची प्रसीध्दीही सर्व पत्रकार बांधवांनी करुन अभियानास प्रोत्साहित केले.*