*कौठाळी येथील आरोग्य उपकेंद्रसाठी नागेश फाटे यांचे जोरदार प्रयत्न* *राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी थेट आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे केली मागणी*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी
राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी थेट आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे.
या भागातील मोठी लोकसंख्या पाहता याठिकाणी आरोग्य उपकेंद्रांची आवश्यकता आहे. ही महत्त्वाची गरज ओळखून सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आणि विट्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश फाटे यांनी शासनदरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणून आरोग्य मंत्री यांनाच समक्ष बुधवार दि ११ मे रोजी भेटून निवेदन दिले आहे.
या निवेदनासोबत गावची लोकसंख्या मोठी असलेला दाखला,ग्रामपंचायत ठराव, या उपकेंद्रसाठी लागणाऱ्या जागेचा उतारा, आदी महत्वपूर्ण कागदपत्रे जोडली आहेत.
या भागातील नागरिक हे भीमा नदी काठावर वास्तव्यास आहेत. दरवर्षी या पूरपरिस्थिती निर्माण होत असते. यामुळे येथील लोक साथीच्या आजाराने त्रस्त होत असतात. यामुळे वरील गंभीर बाब लक्षात घेता. हे आरोग्य उपकेंद्र होणे आवश्यक आहे., ही बाब आरोग्यमंत्री ना., राजेश टोपे यांना पटवून देण्यात नागेश फाटे यांना यश मिळाले आहे. त्यामुळे लवकरच हे उपकेंद्र मंजूर होऊन, या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे.