*आता लक्ष पॅनलमधील उमेदवार निवडीकडे* *लढत दुरंगी होणार की तिरंगी?* *यावरच निवडणूक निकालाचे ठरणार भविष्य*

*आता लक्ष पॅनलमधील उमेदवार निवडीकडे*  *लढत दुरंगी होणार की तिरंगी?*  *यावरच निवडणूक निकालाचे ठरणार भविष्य*

पंढरपूर/प्रतिनीधी 

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील महत्वाची असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात पात्र ठरले आहेत. यामुळे आता या निवडणुकीत किती पॅनल उभे असणार हे अद्याप आस्पष्ट आहे. कोणत्याही पॅनलकडून उमेदवारही अद्याप निवडले गेले नाहीत.तरीही पॅनल प्रमुख यांनी आपल्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यासाठी गावोगावी भेटी देत आहेत.
  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये आता कोण कोणाशी युती करणार? कोण कोणास उमेदवारी देणार? हे मात्र अजूनही गुपित ठेवण्यात आले आहे.
   सध्या विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासाठी सहकार शिरोमणी कारखाना आणि अभिजीत पाटील यांचेसाठी विठ्ठल कारखाना असे पाठबळ दिसून येत आहे.
    मागील याच कारखाना निवडणुकीत चेअरमन कल्याणराव काळे यांना शह देण्यासाठी याच कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार उतरले होते. त्याच पद्धतीने डॉ रोंगे सर यांनीही आपले उमेदवार उभे केले होते.त्यामुळे विद्यमान चेअरमन काळे यांना फारसे पळावे लागले नव्हते. यावेळी मात्र विठ्ठल ची सर्व यंत्रणा काळे यांच्या विरोधात उभी असून चेअरमन अभिजीत पाटील यांनी सत्तांतर करण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एवढेच नाही तर काळे यांना बाजूला सारण्यासाठी विठ्ठलच्या निवडणुकीत एकमेका विरोधात उभे असलेले दिपक पवार यांनी अभिजीत पाटील यांचेशी जुळऊन घेण्यासाठी मनस्थिती तयार ठेवली आहे.
ऍड दिपक पवार हे सहकार शिरोमणीची निवडणूक लढविण्यासाठी मागील निवडणुकीपासून तयारीत आहेत. त्यांनी आण्णा भाऊ पॅनल मध्ये आजवर काम केले आहे. परंतु नेते युवराज पाटील यांनी ही निवडणूक दिपक पवार यांनी स्वतंत्र लढवावी आशी अट घातली होती. त्यावर दिपक पवार यांनीही यावेळी आता स्वतंत्र पॅनल उभे करणे अश्यक  असल्याचे सांगत, आपण अभिजीत पाटील यांचेशी जाण्याची श्यकता व्यक्त केली आहे. त्यासाठी आण्णा भाऊ पॅनल चे सर्वांनी माझ्यासोबत राहावे असे सांगितले आहे.
    या झालेल्या घडामोडीमुळे चेअरमन अभिजीत पाटील हे एकदम सावध झाले आहेत. मागील निवडणुकीत पॅनल लढविणारे दिपक पवार म्हणून यांना काही जागा मिळतील असे वाटत होते. परंतु नेते युवराज पाटील यांची भूमिका पाहता आता कोणत्या आधारावर दिपक पवार यांचे बरोबर जागा वाटप करणार. असा सूरही अभिजीत पाटील यांच्या गटातून ऐकावयास मिळू लागला आहे.
     

चौकट

*प्रत्येक निवडणुकीत माणसे जोडणी..*.

विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भविष्याचे राजकारण डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक निवडणुकीत उतरताना पहावयास मिळते. त्याच पद्धतीने या निवडणुकीतही त्यांना अनेक नेते मिळतील हे मात्र नक्की आहे.