*अॅड. गणेश पाटील यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळावा संपन्न...!!* *विठ्ठल परिवाराची विस्कटलेली... घडी..... गणेश पाटील बसवतील.- आमदार बबनदादा शिंदे*.

*अॅड. गणेश पाटील यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळावा संपन्न...!!*  *विठ्ठल परिवाराची विस्कटलेली... घडी..... गणेश पाटील बसवतील.- आमदार बबनदादा शिंदे*.

करकब/प्रतिनीधी

            राजकारणात मागे पुढे सरकण्याची भूमिका घेतली तर यश आपल्या पाठीशी येत असते. भविष्यात गणेश पाटील हि भूमिका पार पडतील आणि विठ्ठल परिवाराची विस्कटलेली घडी बसवतील यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अशी ग्वाही आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी दिली. 
भोसे (ता.पंढरपूर) येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार शिंदे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संत तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब देहूकर होते. 
यावेळी विठ्ठलचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, युवराज पाटील, विजयसिंह देशमुख, दीपक पवार, दिनकर कदम, सुधाकर कवडे, ज्ञानेश्वर कोरके, शहाजी साळुंखे, बापूराव शिंदे, कालिदास साळुंखे, मारुती भिंगारे, रावसाहेब पाटील, शेखर पाटील,  अतुल खरात, हनमंत मोरे, सुधीर भोसले,   सचिन पाटील, दीपक वाडदेकर,   आदी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब देहूकर यांनी गेल्या तीन पिढ्यांपासून चालत आलेला लोकसेवेचा वसा गणेश पाटील चालवत आहेत तो अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजन पाटील म्हणाले, भोसेच्या पाटील घराण्याने समाजसेवा हेच ब्रीद घेवून निष्ठेचे राजकारण करून तीन पिढ्यांचा विश्वास सार्थ केला. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कै. राजूबापू पाटील हे माझे अत्यंत जवळचे सहकारी होते व ते कायम समन्वयाची भूमिका बजावयाचे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गणेश काम करीत आहे त्याला कै. बापूंची उणीव कधीही भासू देणार नाही असे अभिवचन दिले.    
यावेळी अॅड. गणेश पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना राजकारणात “बाप म्हणून न राहता आई म्हणून राहिलास” तर समाज डोक्यावर घेईल हि स्व. बापूंची शिकवण घेवून सर्व सामान्य जनतेला अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी निस्वार्थपणे करीन असे सांगितले. तसेच सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीत गणेश दादांनी थोडं समजून घेतले असते तर विठ्ठल परिवाराची घडी विस्कटली नसती असा चिमटा काढला असता राजकारणात नवीन असल्याने अशा गोष्टी घडत गेल्या भविष्यात अशा गोष्टी विचारपूर्वक केल्या जातील अशी ग्वाव्ही अॅड. गणेश पाटील यांनी दिली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वनिता घाडगे यांनी केले. प्रस्तावित माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात यांनी केले तर आभार नामदेव कोरके यांनी मानले.