*करकंब येथील सुधीर मारुती रणे च्या ड्रायव्हिंगचा अनुभव आणि धाडसामुळे 40 प्रवाशांना मिळाले जीवदान.....!!* *सोलापूर पुणे महामार्गावरील थरार,बस चालकाला आला हार्टअटॅक.*
करकंब:/प्रतिनीधी
करकंब येथील सुधीर मारुती रणे. या युवकाच्या धाडसामुळे आणि ड्रायव्हिंग चा अनुभव असल्यामुळे एसटी बस मधील चालकाबरोबरच चाळीस जण प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठे जीवदान मिळाल्याचा आनंद प्रवाशातून होत असून या करकंब येथील सुनील मारुती रणे . या युवकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सोलापूर पुणे महामार्गावरून धावत असलेली बस वेळ रात्रीच्या साडे दहा ते आकाराची बस अचानक बस पुलाच्या सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा आवाज आला. प्रवाशांनी पाहिले तर चालकाने मान टाकलेली अशातच प्रवाशांमधून आरडाओरड सुरू झालेली अशातच एका युवकाने धाडस करून बसच्या स्टेरिंगचा ताबा घेऊन ड्रायव्हिंगच्या अनुभवाचा वापर करून हँडब्रेकवर बस थांबविल्याने अनर्थ टळला .आणि 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले हा अंगावर शहारे आणणारा थरार पुणे महामार्गावर पळसदेव हद्दीत घडला.
८ जानेवारी रोजी उदगीर डेपो मधून पुण्याकडे निघालेली बस नंबर (MH 24 AU 8065) साधारण पणे ३५/४०प्रवाशी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वरून पळसदेव गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री १०:३०/११वाजेच्या दरम्यान बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हार्ट अटॅक आला . त्या मुळे ते चालू बस स्टरींगवरच कोसळता त्या मुळे बस वरील नियंत्रण सुटल्या मुळे बस महामार्गाच्या कडेला लावलेल्या लोखंडी गार्ड धडकली ह्याचं गाडीतून पुण्याकडे निघालेले प्रवासी सुधिर मारुती रणे (रा . करकंब.ता. पंढरपूर) यांनी धाडसाने ड्रायवर केबिन मध्ये जाऊन स्टरिग स्वतःच्या नियंत्रणात घेतले आणि बस वर नियंत्रण ठेवून उभी केली. त्या मुळे मोठा अनर्थ घडण्या अधिक बस थाबवण्यात त्यांना यश आले . बस जर नियंत्रणात नसती आली तर बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मर वर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅवॉटरच्या पाण्यात जाऊन पलटी झाली असती.परंतु बस मधिक सुधिर मारुती रणे यांच्या मुळे बस मधुन प्रवास करणारे.35/40 प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले.आणि मोठा अनर्थ टळला बस सुरक्षित थांबल्यावर प्रवाशाने सुटकेचा सुस्कारा सोडला. प्रवाशी सुधिर रणे व वाहक संतोष गायकवाड यांनी बस चालक गोविंद सूर्यवंशी यांनी त्यांनी बोनेटवर झोपवून सुधिर रणे यांनी त्यांना cpr दिला त्यांना शुद्ध आले. पणं परत ते बेशुद्ध झाले प्रवाशी सुधिर रणे यांना प्रायव्हेट बस चालक म्हणून 10ते12वर्षाचे अनुभव असल्या मुळे ते अंबुलान्स ची वाट न पहाता लगेच स्वतः सुधिर रणे बस चालवत भिगवन येते घेउन गेले . व लगेच भिगवन येतील यशोधरा हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्या मुळे बस चालक गोविंद सूर्यवंशी वेळेत उपचार मिळाले. त्या मुळे ते शुद्धीवर आले. त्या मुळे सुधिर रणे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे .
~~~~~~~~
कंपनीच्या कामानिमित्त करकंब मधून मुंबईला निघालो होतो टेम्भुर्णी येथून पुणे स्वारगेटला जायचे होते परंतु सोलापूर आणि कुर्डुवाडी येथून स्वारगेटला जाणाऱ्या बस प्रवाशांनी फुल्ल भरून येत होत्या एक दीड तासाचा कालावधी उलटून गेला तरीही बस मध्ये जागा मिळेना त्यातच वेळ रात्रीची असल्याने नाईलाजास्तव उदगीर वरून आलेली आणि स्वारगेटला न जाता शिवाजीनगरला जाणाऱ्या बस मध्ये बसावे लागले घडल्या प्रसंगाला धैर्याने आणि ड्रायव्हिंगच्या अनुभवातून सामोरे गेलो त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा आमची काय अवस्था झाली असती हे न सांगण्या पलीकडील असल्याचे सुधीर रणे यांनी यावेळी सांगितले.