*आढीव येथे वसंतराव काळे एमएस-सीआयटी सेंटरचे उद्घाटन*  

*आढीव येथे वसंतराव काळे एमएस-सीआयटी सेंटरचे उद्घाटन*  

पंढरपूर/प्रतिनिधी
आढिव ता. पंढरपूर येथील  भैरवनाथ विद्यालया मध्ये वसंतराव काळे एम एस सी आय टी सेंटरचे उद्घाटन वसंत दादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
 यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे संचालक दिनकर चव्हाण, शंकर चव्हाण सरपंच सोमनाथ नवले उपसरपंच सत्यवान थोरात  तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन चव्हाण शाळा समिती अध्यक्ष अंकुश चव्हाण सोमनाथ गोरे प्राचार्य शिवाजी शेंडगे संतोष गुळवे उपस्थित होते.
 यावेळी बोलताना कल्याण काळे म्हणाले की आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान गरजेचे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  या एमएस-सीआयटी सेंटरचा  उपयोग होणार आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान घेऊन परिपूर्ण व्हावे असे आवाहन केले.