*राज्याचे माजी सचिव जे.पी डांगे यांनी दिली चळे येथील शिक्षण शास्त्र महाविद्यालयास भेट.*

पंढरपूर /प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्य प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे.पी डांगे यांनी पंढरपूर तालुक्यातील चळे येथील बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भेट दिली. दरम्यान संस्थेच्या कामकाजाविषयी तसेच अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बळीराम बनसोडे यांनी चळे ते चळे पाटी या रस्त्य संबंधी लक्ष घालण्याची मागणी केली असता सदर अडचणीवर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी डांगे यांनी दिले.
या प्रसंगी अध्यक्ष बळीराम बनसोडे, सचिव नवनाथ मोरे, स्वेरी प्राचार्य बी.पी रांगे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, व्यवस्थापक बालाजी बनसोडे,महसूल विभागाचे सुरवसे, गोरे, सुरेश बनसोडे, प्रा. होनकळस, ज्ञानेश्वर वाघमोडे, प्राचार्य डॉ. कोडलकर आदी उपस्थित होते.