*दिंडोरीचे खा.भास्कर भगरे यांचे पंढरीत स्वागत* *राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते नागेशदादा फाटे यांच्या हस्ते सत्कार*
पंढरपूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचे दिंडोरी मतदारसंघाचे खा.भास्कर भगरेसर हे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला आले होते. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी पंढरपूर शहराध्यक्ष सुभाषदादा भोसले, युवक शहराध्यक्ष स्वप्निल जगताप, तालुका सचिव विजय गायकवाड सर, सचिन नवनाथ मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोणतेही नेते पंढरीत आले असता. त्यांचा स्वागत आणि सत्कार करण्याची परंपरा प्रदेशाध्यक्ष नागेश दादा पाटील यांनी ठेवली आहे. त्याच धर्तीवर हा सत्कार करण्यात आला आहे.