*आय एम ए च्या अध्यक्षपदी डॉ. शीतल शहा यांची निवड *

*आय एम ए च्या अध्यक्षपदी डॉ. शीतल शहा यांची निवड *

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर पंचक्रोशीत लहान मुलांचे देवदूत अशी ख्याती असलेले शहरातील बाल रोग तज्ञ डॉ शितल के शहा यांची आज आय एम ए च्या अध्यक्षपदी सर्व डॉक्टरांच्या एकमताने निवड करण्यात आली .

पंढरपूर शहरात नव्हे तर जिल्ह्यात व महाराष्ट्रात देवदूत म्हणून मानले जाणारे बाल रोग तज्ञ डॉक्टर शितल के शहा यांची अध्यक्षपदी वर्णी लागली हे पंढरपूर शहरांमध्ये समाजात पंढरपूर शहरातील लोकांतून डॉ शितल शहा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

डॉ शहा यांनी हजारो बालकांना नवजीवन दिले आहे. अगदी सातारा कराड सांगली तसेच कर्नाटक राज्यातून देखील हजारों पालक आपल्या चिमुकल्यांना घेऊन मोठया आशेने पंढरीत येतात आणि आपल मुल वाचलं पंढरीचा जणू पांडुरंगचा पावला या आनंदात घरी जातात.

डॉ शहा अनेकदा हजारो रुग्णावर मोफत उपचार करुन जाऊ देतात,

पैसै नाहित म्हणुन कुणाची अडवणूक केली नाही.

करोडो रुपयांची अत्याधुनिक मशिनरी हॉस्पिटल साठी खरेदी केली आहे. अनेक उपकृत पालक उपकाराची जाणीव ठेवत डॉ. शितल शहा यांचा वाढदिवस एखाद्या सणा सारखा साजरा करतात.