*सहकार शिरोमणी की बचाव संघर्ष समिती पेटली इरेला*! *थेट कारखाना स्थळावर जावून दिली कार्यकारी संचालकाकडे केली रीतसर चौकशी*
पंढरपूर/ प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि भाळवणी ता पंढरपूर बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जावून भेट घेतली. यावेळी कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची भेट घेता वस्तुस्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला .
यावेळी या संघर्ष समितीची मधील सदस्यांनी हा सहकार शिरोमणी कारखाना भाडेतत्वावर देवू नये .अशी विनंती केली. व सद्यस्थितीची माहिती मागितली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक घोगरे यांनी तोंडी बोलणे सुरू असल्याचे कबूल केले. यावेळी उपस्थित संचालक सुरेशबापू देठे यांनी याबाबत मिटिंग मध्ये कोणताही ठराव अद्याप झाला नसल्याचे सांगितले. चेअरमन यांचेशी चर्चा करून दोन दिवसात संचालक मिटींग घेऊन याबाबत खुलासा करू असे सांगितले.
यावेळी माजी संचालक दिपकदादा पवार,नामदेव ताड,ज्ञानेश्वर खरडकर, दीपक गवळी, नंदकुमार बागल, विठ्ठल संचालक धनंजय काळे, प्रकाश देठे, बाबा काळे,धोंडीराम घोलप, विलास देठे, रामचंद्र ढोबळे, बंडू हजारे, रावसाहेब निकम, हनुमंत सोनवले सर उपस्थित होते.