*शिवसेनेचे नितीन काळे यांचे विजयासाठी आर.पी.आय.ची हमी.!* *महायुतीतून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडे आर .पी.आय. ची. लेखी मागणी* *कासेगावच्या तिसऱ्या आघाडीकडूनही पहिली पसंदी*
पंढरपूर/प्रतिनिधी
अवघा महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ढवळून निघत आहे. दीपावलीच्या सण संपला असून आता निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे भाई नितीन काळे यांना विजयी करण्यासाठी कासेगाव येथील तिसऱ्या आघाडीचे नेते आणि आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी मात्र थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लेखी निवेदन देऊन, नितीन काळे यांना महायुतीमधून शिवसेनेची उमेदवारी द्यावी. आम्ही त्यांना विजयी करू. अशी थेट हमीच दिली आहे. यामुळे कासेगाव जिल्हा परिषद गटमधील इच्छुक दिग्गज मातब्बरांना धक्का बसला आहे.
कासेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणुकीसाठी , या गावातील तिसरी आघाडी महत्त्वपूर्ण घटक आहे. आजवरचा इतिहास पाहिला असता काशिगाव मधील तिसरी आघाडी ही कायम अग्रेसर राहिली आहे. याच तिसऱ्या आघाडीचे प्रमुख नेते आणि आरपीआयचे नेते आप्पासाहेब जाधव यांनी मात्र कासेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाई नितीन काळे यांना उमेदवारी देण्यात यावी. अशी मागणी शिवसेना कार्यालयाकडेही सचिव संजय मोरे यांच्याकडेही रीतसर केली आहे. या कासेगाव जिल्हा परिषद गटातील आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या आरपीआयचीच ही मागणी असल्याने महायुतीला याबाबतचा विचार करावा लागणार आहे.
भाई नितीन काळे हे उमदे नेतृत्व असून कायम समाजसेवेसाठी तात्काळ हजर असते. त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढला आहे. याचा वापर महायुतीने शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देवून करावा. आम्ही त्यांना विजयी करून दाखवू. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे महायुतीला ही जागा शिवसेनेसाठी सोडवून घ्यावी लागणार आहे. त्यावर भाई नितीन काळे यांचे उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे.